

मुंबई टी-२० लीगचा दुसरा सेमीफायनलचा सामना वानखेडे मैदानावर रंगला होता. या सामन्यात सिद्धेश लाडच्या नेतृत्वाखाली मराठा रॉयल्सने नॉर्थ मुंबई पँन्थर्सचा दारूण पराभव केला. अगदी अटीतटीच्या सामन्यात मराठा रॉयल्सने ३ विकेट्सने नॉर्थ पँथर्सचा पराभव केला. एक बॉल बाकी असताना मराठा रॉयलच्या रोहन राजेने विजयी चौकार लगावला आणि सामना खिशात घातला
या विजयासह मराठा रॉयल्सने फायनलमध्ये धडक मारलीये. शनिवारी त्यांचा सामना शिवम दुबेच्या आर्क्स अंधेरीसोबत होणार आहे. वानखेडे मैदानावर संध्याकाळी सात वाजता मराठा रॉयल्स विरूद्ध आर्क्स अंधेरी यांच्यात मुकाबला खेळवला जाणार आहे.
या सामन्यात मराठा रॉयल्सने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. फलंदाजीला सुरुवात करताना नॉर्थ मुंबई पॅन्थर्सची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. अवघ्या १७ रन्सच्या स्कोरवर टीमने कर्णधार अजिंक्य रहाणेची विकेट गमावली. पँथर्नसकडून अभिग्यान कुंडूने सर्वाधिक ४० रन्सची खेळी केली. त्या खालोखाल अनिश चौधरीने ३३ रन्सची खेळी केली. २० ओव्हर्सच्या शेवटी १० विकेट्स गमावून पँथर्सने १४८ रन्सचा स्कोर केला.
रॉयल मराठाच्या फलंदाजीची सुरुवात फारच खराब झाल्याचं पाहायला मिळालं. पहिल्याच ओव्हरमध्ये मराठा रॉयल्सने दोन विकेट्स गमावले. चिन्मय सुतार आणि अयाझ खान या दोघांनी ५१ रन्सची पार्टनरशिप केली. मात्र अयाझची विकेट गेल्यानंतर टीमची पडझड झाली. तरीही चिन्मय सुतारने एक बाजून लावून धरली होती. अखेरीस त्याने टीमला विजय मिळवून दिलाच. चिन्मयने या सामन्यात नाबाद ४९ चेंडूंमध्ये ६२ धावांची खेळी केली.
कर्णधार शिवम दुबेच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर आर्क्स अंधेरी संघाने नुवामा प्रायव्हेट टी-20 मुंबई लीग 2026 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात आर्क्स अंधेरीने आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब्स संघाचा पाच गडी राखून पराभव करत फायनलमध्ये धडक मारली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.