विश्वचषकात संघाच्या खराब कामगिरीनंतर बाबर आझमने पाकिस्तान संघाचं कर्णधारपद सोडलं आहे. बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शाहीन शाह आफ्रिदीकडे टी-२० आणि शान मसूद याच्याकडे कसोटी सामन्यातील कर्णधारपदाची जबाबदारी सोपवलं आहे. (Latest Marathi News)
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वनडे फॉरमॅटमसाठी कोणालाही नियुक्त करण्यात आलेलं नाही. पाकिस्तान क्रिकेट संघाने विश्वचषकात खराब कामगिरी केली. पाकिस्तान संघाने सुरुवातीला दोन सामने जिंकले. त्यानंतर पाकिस्तानने चारही सामने गमावले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
विश्वचषकाच्या स्पर्धेत पाकिस्तान संघाने ९ सामन्यापैकी ४ सामने जिंकले आहेत. तर ५ सामने हरले आहेत. यामुळे पाकिस्तानचा संघ विश्वचषकातून बाहेर झाला. विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघात मोठे फेरबदल केले आहेत. बाबर आझमने कर्णधार पदाचा राजीनामा दिल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नव्या कर्णधारांची घोषणा केली आहे.
पाकिस्तानच्या टी-२० संघाचं नेतृत्व जलद गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीकडे सोपविण्यात आलं आहे. तर कसोटी सामन्याचं नेतृत्व शान मसूदकडे सोपविण्यात आलं आहे.
पाकिस्तानच्या संघाने वनडे फॉरमॅटमध्ये खराब कामगिरी केली आहे. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून टी-२० फॉरमॅटमध्ये नव्या कर्णधाराची नियुक्ती करण्यात आला आहे. मात्र, वनडे फॉरमॅटमध्ये अद्याप नवा कर्णधार नियुक्त करण्यात आलेला नाही.
मात्र, दुसरीकडे सोशल मीडियावर शाहीन आफ्रिदीकडे वनडे कर्णधारपद सोपविण्यात येईल अशी चर्चा आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.