मुबंईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंडच्या संघात सेमिफायनलचा सामना होत आहे. या सामन्यात भारतीय संघाचा रन मशीन ओळख असलेल्या विराट कोहलीने भीम पराक्रम केलाय. कोहलीने ५० वं शतक करत सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडलाय. शतक पूर्ण झाल्यानंतर स्टेडियमवरील सर्व प्रेक्षकांसह तंबूत बसलेल्या खेळाडूंनी उभे राहत कोहलीचं अभिनंदन केलं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही विराटचं कौतुक करत एक भावनिक पोस्ट केलीय.
विक्रम मोडल्यापेक्षा विराट कोहलीने नवा विक्रम केल्याचा आनंद सचिन तेंडुलकरच्या चेहऱ्यावर अधिक दिसत होता. कोहलीचं कौतुक करताना सचिनने एक भावनिक पोस्ट लिहिलीय. ही पोस्ट एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या साइटवर पोस्ट करण्यात आलीय.
काय लिहिलंय पोस्टमध्ये
जेव्हा मी तुम्हाला पहिल्यांदा भारतीय ड्रेसिंग रुममध्ये भेटलो, तेव्हा इतर संघसहकाऱ्यांनी तुझी थट्टा करण्याचं ठरवलं. त्यांनी तुला माझ्या पाया पडायला लावलं. त्या दिवशी मला हसू आवरता आले नाही. पण लवकरच, तू तुझ्या उत्कटतेने आणि कौशल्याने माझ्या हृदयाला स्पर्श केलास. तो तरुण मुलगा ‘विराट’खेळाडू झाला, याचा मला खूप आनंद आहे. एखाद्या भारतीय खेळाडूंनेच माझा विक्रम मोडणं यापेक्षा दुसरा कोणताच आनंद असू शकत नाही. तेपण तेव्हा जेव्हा वर्ल्डकपचा सेमिफायनलचा सामना खेळला जात आहे.
मुबंईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील पहिला सेमीफायनलचा सामना होत आहे. विराट कोहलीने या सामन्यात १०६ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं. हे त्याच्या वनडे कारिकिर्दीतील ५० वे शतक ठरलं. यासह तो वनडे क्रिकेटमध्ये सचिनला मागे सोडत शतकांचं अर्धशतक पूर्ण करणारा जगातील पहिलाच फलंदाज ठरलाय. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना ईडन गार्डन्सच्या मैदानावर विराट कोहलीने ४९ वं शतक पूर्ण केलं. या शतकाने त्याने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.