Babar Azam: वर्ल्डकपमधील अपयशानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप; बाबर आझमनं सोडलं कर्णधारपद

Babar Azam: वर्ल्ड कप २०२३ मध्ये संघाच्या खराब कामगिरीनंतर बाबर आझमने पाकिस्तान क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडलंय.
Babar Azam
Babar AzamTwitter X
Published On

Babar Azam Steps Down As Pakistan Captain:

भारतात झालेल्या आयसीसी वर्ल्ड कप २०२३ मध्ये पाकिस्तान संघाची खराब कामगिरी राहिली. पाकिस्तान साधा नॉक ऑऊट फेरीपर्यंत पोहोचू शकला नाहीये. या खराब कामगिरीमुळे पाकचा कर्णधार बाबर आझमने मोठा निर्णय घेतलाय. बाबरने क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमधील पुरुष संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतलाय. (Latest News)

हिरव्या जर्सीमधील बाबर सेना वर्ल्डकपमधून बाहेर पडलाय. पाकिस्तान संघाने साखळी सामन्यातील ९ सामन्यात फक्त विजय मिळवले होते. त्यामुळे पाकिस्तान संघाने सेमिफायनलमध्ये पोहोचण्याची संधी गमावली होती. अव्वल दर्जाचे गोलंदाज असतानाही वर्ल्ड कपमध्ये खराब कामगिरी केल्यामुळे बाबरच्या नेतृत्वावर टीका केली जात होती. त्यानंतर बाबरने एक निवेदन जारी करत सर्व फॉरमॅटमधून संघाचे कर्णधारपद सोडत असल्याचं त्याने सांगितलं.

कर्णधारपद सोडताना बाबर झाला भावूक

दरम्यान बाबर आझमला २०१९ मध्ये पहिल्यांदा पाकिस्तानी संघाचा कर्णधार बनवण्यात आले आणि २०२१ मध्ये तो तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार बनला होता. "मला २०१९ मध्ये पाकिस्तानचे नेतृत्व करण्यासाठी पीसीबीकडून कॉल आला तेव्हाचा क्षण मला चांगला आठवतोय. गेल्या चार वर्षांत, मी मैदानावर आणि मैदानाबाहेर अनेक चढउताराचे अनुभव अनुभवले. परंतु मी मनापासून आणि उत्कटतेने क्रिकेट विश्वात पाकिस्तान क्रिकेट संघाचा आदर आणि अभिमान कायम राखण्याचे ध्येय ठेवले होते.

खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापन यांच्या सामूहिक प्रयत्नांमळे आपण व्हाईट-बॉल फॉरमॅटमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचलो होतो. परंतु या प्रवासादरम्यान पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी अतुट पाठिंबा दिला. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. आज मी सर्व फॉरमॅटमध्ये पाकिस्तानच्या कर्णधारपदावरून पायउतार होत आहे. हा कठीण निर्णय आहे परंतु मला वाटते की, या निर्णयाची ही योग्य वेळ आहे,” असं बाबरने X वर दिलेल्या निवेदनात म्हटलंय.

यापढे मी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळाडू म्हणून पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करेन. माझ्या अनुभवाने आणि समर्पणाने नवीन कर्णधार आणि संघाला पाठिंबा देईल. माझ्यावर महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवल्याबद्दल मी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो," असंही बाबर आझमने म्हटलंय.

दरम्यान, पाकिस्तानने वर्ल्ड कप २०२३ मध्ये आपला शेवटचा सामना ११ नोव्हेंबरला खेळला होता, ज्यामध्ये इंग्लंडने त्याचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. त्यामुळे पाकिस्तान संघाला पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागलं. या पराभवानंतर बाबर आणि त्याची टीम सोमवारी १३ नोव्हेंबरला पाकिस्तानात पोहोचली. तेव्हापासून बाबर आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या बैठकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. पण आज त्याने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला.

Babar Azam
World Cup: कोहलीच आहे किंग; एकाच वर्ल्डकपमध्ये ठोकली सर्वाधिक अर्धशतकं, सचिन तेंडुलकरला सोडलं मागे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com