Wasim Akram Statement: पाकिस्तानचा संघ WC मधून बाहेर पडताच दिग्गज क्रिकेटपटू भडकला,म्हणाला 'बाबर आझमला बळीचा बकरा...'

Wasim Akram On Babar Azam : पाकिस्तानचा संघ वर्ल्डकपमधून बाहेर पडताच वसीम अक्रमने मोठं वक्तव्य केलं आहे.
Wasim Akram Statement
Wasim Akram Statementtwitter
Published On

Wasim Akram On Babar Azam :

इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवासह पाकिस्तानचा वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला आहे. १२ वर्षांनंतर पाकिस्तानचा संघ पुन्हा एकदा वर्ल्डकपची सेमीफायनल गाठण्यात अपयशी ठरला आहे.

दरम्यान या निराशाजनक कामगिरीनंतर बाबर आझमच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. याबाबत भाष्य करताना पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रमने मोठं वक्तव्य केलं आहे.

पाकिस्तानचा संघ पराभूत होताच माजी खेळाडूंनी पाकिस्तान संघातील खेळाडूंसह बाबर आझमवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. काही माजी खेळाडूंनी बाबरची कर्णधारपदावरुन हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. या स्पर्धेत बाबर आझम कर्णधार आणि फलंदाज म्हणून पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. एकीकडे बाबर आझमवर टीका होत असताना वसीम अक्रमने त्याला पाठिंबा देत पाकिस्तानच्या क्रिकेट सिस्टमला जबाबदार ठरवलं आहे.

Wasim Akram Statement
IND vs NED: नेदरलँड विरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियात होणार बदल! या २ खेळाडूंना विश्रांती तर स्टार गोलंदाज करणार पदार्पण

'एकटा कर्णधार सामना खेळत नाहीये. हो, त्याने वर्ल्डकप स्पर्धेत आणि आशिया चषक स्पर्धेत नेतृत्व करत असताना चुका केल्या. मात्र त्याची एकट्याची चूक नाही. गेल्या १ वर्षांपासुन पाकिस्तान क्रिकेटचं सिस्टम चूका करतंय. इथे खेळाडूंनाच माहीत नाही की कोच कोण आहे. तुम्ही त्याला बळीचा बकरा बनवू शकत नाही.' असं वसीम अक्रम म्हणाला. (Latest sports updates)

Wasim Akram Statement
World cup final Prediction: वर्ल्डकप २०२३ चा अंतिम सामना 'या' दोन संघांमध्येच होणार; मिसबाह-उल-हकचे भाकीत

तसेच तो पुढे म्हणाला की,' बाबरचा फॅन म्हणून आम्हाला असं वाटलं होतं की, सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो टॉप ३ मध्ये असेल. मात्र भारतात खेळताना तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. जर वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाज चांगली गोलंदाजी करत नसतील तर या गोष्टीचं खापर केवळ बाबरवर का फोडावं. मात्र गोष्ट जेव्हा नेतृत्वाची असते तेव्हा सर्वांनी जबाबदारी घेणं गरजेचं आहे.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com