आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दमदार खेळ केला. या सामन्यात श्रीलंकेचा संपूर्ण डाव अवघ्या ५० धावांवर संपुष्टात आला. हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला केवळ ५१ धावांची गरज होती.
या धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी अवघ्या ६.१ षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं. भारतीय संघातील गोलंदाजांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमूळे या सामन्याचा शेवट एकतर्फी झाला.
या विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने असं काहितरी केलं ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने आशिया चषकाची ट्रॉफी स्वीकारल्यानंतर ती ट्रॉफी सपोर्ट स्टाफमध्ये असलेल्या रघुकडे सोपवली. आशिया चषकाची ट्रॉफी जिंकताच भारतीय संघातील खेळाडूंचा आनंद गगनात मावेनाला झाला होता. रोहितने सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना ग्रुप फोटोसाठी बोलावून हा आनंद द्विगुणित केला.
कोण आहे रघु?
राघवेंद्र म्हणजेच रघु हा भारतीय संघातील थ्रो डाऊन स्पेशलिस्ट आहे. भारतीय संघातील फलंदाज जेव्हा नेट्समध्ये सराव करत असतात त्यावेळी रघू हा भन्नाट गतीने चेंडू टाकून भारतीय फलंदाजांना सरावात मदत करतो.
त्यामुळेच भारतीय फलंदाज जगातील कुठल्याही वेगवान गोलंदाजांचा सामना करण्यास सक्षम आहेत. २०११-१२ मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना रघुची भारतीय संघात एन्ट्री झाली होती.
त्यानंतर २०१४ मध्ये जेव्हा भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता त्यावेळी रघुची पुन्हा एकदा भारतीय संघात एन्ट्री झाली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत तो भारतीय संघात सपोर्ट स्टाफची भुमिका बजावतोय. (Latest sports updates)
रघुला भारतीय संघात आणण्याचं श्रेय माजी भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकरला जातं. रघु बँगलोरमध्ये असलेल्या NCA मध्ये सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडला सराव करण्यात मदत करत होता. त्यावेळी या दोघांनी बीसीसीआयकडे रघुची शिफारस केली होती.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.