IND vs SL, Asia Cup LIVE: लंकेला आव्हान देण्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग ११ मध्ये ६ मोठे बदल; अक्षरच्या जागी या खेळाडूला मिळाली संधी

India vs Srilanka Asia Cup Playing 11: या सामन्यासाठी भारतीय संघात ६ मोठे बदल करण्यात आले आहेत .
India vs Srilanka Asia Cup Playing 11
India vs Srilanka Asia Cup Playing 11Saam tv news

India vs Srilanka Asia Cup Playing 11:

कोलंबोच्या मैदानावर भारत विरूद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये आशिया चषकाचा अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

तर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना दिसून येणार आहे. कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग ११ मध्ये विराट कोहली,हार्दिक पंड्या,कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजला स्थान दिलं आहे. तर दुखापतीमुळे संघाबाहेर झालेल्या अक्षर पटेलच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली आहे.

India vs Srilanka Asia Cup Playing 11
PAK vs SL, Asia Cup 2023: पाकिस्तानचा संघ बाहेर पडताच शोएब अख्तर कडाडला! IND-PAK अंतिम सामन्याबाबत केलं मोठं वक्तव्य

या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार ), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जड़ेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज

अशी आहे श्रीलंकेची प्लेइंग ११:

पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलांका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेलालागे, दुशान हेमंथा, प्रमोद मदुशन, मथीशा पथिराना (Latest sports updates)

India vs Srilanka Asia Cup Playing 11
Asia Cup 2023 Final: आशिया चषकाच्या फायनलमध्ये टीम इंडियाची चिंता वाढवणारी आकडेवारी; हा रेकॉर्ड कोणालाच नाही जमला

भारतीय संघाने सुपर ४ फेरीतील सामन्यांमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेवर विजय मिळवला होता. तर बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघला पराभवाचा सामना करावा लागला होता.

तर श्रीलंकेबद्दल बोलायचं झालं तर, या संघाने पाकिस्तान आणि श्रीलंकेचा सुपर ४ मध्ये धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात श्रीलंकेला ४१ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.

बांगलादेशविरूद्ध करावा लागला पराभवाचा सामना..

सुपर ४ फेरीत भारतीय संघाचा शेवटचा सामना बांगलादेश संघाविरूद्ध रंगला होता. या सामन्यात भारतीय संघाला ६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यासाठी हार्दिक पंड्या, विराट कोहली, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजला विश्रांती दिली गेली होती.

तर सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकुर, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद शमीला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले गेले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com