

मुलाला तिरंदाज बनवण्यासाठी आईने सोनं गहाण ठेवलं.
आर्थिक अडचणींवर मात करत साताऱ्याच्या खेळाडूने तिरंदाजीत मोठं यश मिळवलं.
आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडूने दोन सुवर्णपदके जिंकली.
आता बातमी आहे तुमची गर्वानं मान उंचावणारी आणि तुमच्या हृदयाला स्पर्श करणारी. मुलाला तिरंदाज बनवण्यासाठी साताऱ्यातल्या एका आईनं आपलं सोनं गहाण टाकलं. मात्र मुलानंही गहाण टाकलेल्या सोन्याचं चिज केलं आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत थेट दोन सुवर्णपदकांची कमाई केली. आई आणि लेकाच्या संघर्षातून मिळवलेल्या देदीप्यमान यशावरचा हा रिपोर्ट.
खेळात भारताचं नाव रोषण कऱण्यासाठी कधीकाळी आईचं सोनं गहाण ठेवणाऱ्या महाराष्ट्राच्या कर्तुत्ववान सुपुत्रानं आज भारतासाठी गोल्ड मेडल जिंकून आईच्या त्या त्यागाचं खऱ्या अर्थाने सोनं केलंय. होय. ही कहाणी प्रेरणादायीये. ही कहाणी आपल्या मराठमोठ्या साताऱ्याच्या लेकाची आहे. जपानमधल्या आशियाई खेळात भारताचा डंका कसा वाजला पाहा.
साताऱ्याच्या साहिलला 2 सुवर्णपदकं
जपानमध्ये आशियाई क्रिडा स्पर्धेत साहिल जाधवला यश
तिरंदाजीत साताऱ्याच्या साहिलची 2 सुवर्ण पदकांची कमाई
कंपाऊड मिक्स आणि पुरुष कंपाऊडमध्ये सुवर्ण पदक
तिरंदाजीत दक्षिण कोरियाच्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्यावर मात
जपानमध्ये आशियाई खेळ 2026 स्पर्धा सुरुये. यास्पर्धेत साताऱ्याच्या साहिल जाधवनं 2 सुवर्णपदकाची कमाई केलीये. कंपाऊंड मिक्स टीम स्पर्धा आणि पुरुष कंपाऊंड टीम स्पर्धेत त्यानं हे गोल्ड मिळवलंय. आर्चरीमध्ये दक्षिण कोरियाच्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्यावर त्यानं मात करत तब्बल २ सुवर्णपदकांची कमाई करत या मराठमोळ्या पठ्ठ्याने भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकवलाय.
साहिलच्या या देदिप्यमान यशानंतर त्याच्या घरी आनंदाचं वातावरणये. लेकाच्या मागे लग्नासाठी तगादा लावला तेव्हा माझं लग्नच आर्चरीशी झालंय. असं ठामपणे सांगत ऑलिंपिकचे स्वप्न डोळ्यात घेऊन रात्रं-दिवस घाम गाळणाऱ्या साहिलने आज स्वतःला जगासमोर सिद्ध केलंय.
साताऱ्यासारख्या छोट्या शहरातून संघर्ष करत थेट आशियाई खेळांमध्ये देशाचा मान उंचावणं ही सोपी गोष्ट नव्हती. आज २ गोल्ड मेडल भारतात घेऊन येणाऱ्या या साहिलनं आर्चरी खरेदी करण्यासाठी आपल्या आईचं सोनं गहाण ठेवलं होतं, केवळ आईच्या असीम त्यागाच्या आणि वडिलांच्या विश्वासाच्या जोरावर या पठ्ठ्यानं केलेली कामगिरी ही नक्कीच सुवर्णअक्षरात नोंदवली जाईल. आईच्या त्यागाचं सोनं करणाऱ्या या सातारच्या सुपुत्राला साम टीव्हीचा सलाम.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.