रोहित शर्मा-शुभमन गिलचे तांडव! दोन्ही सलामीवीरांनी ठोकले वादळी शतक; विंडीजची पळता भुई थोडी

Rohit Sharma Shubman Gill Century : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत रोहित शर्मा आणि शुभमन गिलने तुफानी शतके ठोकली. रोहितने १०१ तर गिलने १४५ धावा करत भारताच्या ४०६ धावांच्या लक्ष्याचा जोरदार पाठलाग केला.
Rohit Sharma Shubman Gill Century
Rohit Sharma Shubman Gill Century
Published On: 

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय (ODI) सामन्यात भारतीय संघाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी तुफानी फलंदाजी करत शानदार शतके ठोकली. वेस्ट इंडिजने दिलेल्या ४०६ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना या दोन्ही फलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. रोहित शर्माने ७५ चेंडूत १०१ धावांचा पाऊस पाडला.

रोहित-गिलची तुफानी शतके अन् जोरदार पलटवार

४०६ धावांच्या विराट आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अत्यंत आक्रमक झाली. रोहित शर्मा आणि कर्णधार शुभमन गिल यांनी सुरुवातीपासूनच चौकार आणि षटकारांची उधळण केली. रोहित शर्माने आपला नेहमीचा 'हिटमॅन' अंदाज दाखवत शानदार शतक पूर्ण केले. या खेळीदरम्यान रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपल्या १२,००० धावांचा टप्पाही पार केला.

रोहित शर्माने ७५ चेंडूमध्ये ६ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने १०१ धावांची खेळी केली. रोहित शर्माने शुभमन गिल याच्यासोबत २६.२ षटकात २५५ धावांची विक्रमी भागिदारी केली.

Rohit Sharma Shubman Gill Century
MPSC परीक्षार्थींसाठी सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा;  ७ मोठे निर्णय

शुभमन गिलनेही क्लासिक आणि तितकीच आक्रमक फलंदाजी करत आपले शतक साजरे केले. शुभमन गिल ८६ चेंडूत १४५ धावांवर खेळत आहे. या खेळीत गिलने १७ चौकार आणि ६ षटकार ठोकले आहे. रोहित आणि गिल या दोन्ही सलामीवीरांच्या शतकी भागीदारीमुळे भारताने वेस्ट इंडिजच्या डोंगराएवढ्या आव्हानाला सडेतोड उत्तर दिले असून सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकवला आहे.

Rohit Sharma Shubman Gill Century
रोहित शर्माचा तोडफोड षटकार! '12 हजारी मनसबदार' हिटमॅनचा खतरनाक अंदाज, VIDEO व्हायरल

वेस्ट इंडिजचा ४०५ धावांचा डोंगर

या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ५० षटकांत ७ गडी गमावून ४०५ धावांची डोंगराएवढी धावसंख्या उभारली होती. वेस्ट इंडिजकडून जॉन कॅम्पबेल (१०१), अमिर जांगू (११४) आणि कर्णधार शई होप (१०४) या तिघांनी धडाकेबाज शतके झळकावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com