

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. येथे भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलने २२३ धावांची ऐतिहासिक नाबाद खेळी साकारली. या शानदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ४०६ धावांचे ऐतिहासिक लक्ष्य गाठण्यात यश मिळवले.
या सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ७ बाद ४०५ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने ४३.३ षटकांत २ बाद ४०६ धावा करून विजय मिळवला. भारतीय संघाने केवळ पहिल्यांदाच ४०० हून अधिक धावांचे लक्ष्य यशस्वीपणे पार केलं. तर एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा हा केवळ दुसराच संघ ठरला. यापूर्वी २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेने ४३८ धावांचे लक्ष्य गाठले होते.
भारताने ३९ चेंडू शिल्लक असताना हा सामना जिंकला. या विजयासह भारताने मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे, या सामन्यात भारताकडून दोन आणि वेस्ट इंडीजकडून तीन शतके झळकावण्यात आली.
शुबमन गिलचे वादळी द्विशतक आणि हिटमॅन रोहित शर्माच्या झंझावाती शतकाच्या बळावर भारताने विडिंजचा ८ विकेटने पराभव केला. विडिंजने दिलेले ४०६ धावांचे आव्हान भारताने फक्त २ विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. गिलने १६० च्या स्ट्राईक रेटने द्विशतकी खेळी केली. तर रोहित शर्मानेही वादळी शतक ठोकले.
या विजयासह भारताने ३ सामन्याच्या वनडे मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. गुवाहाटीमध्ये झालेल्या या दुसऱ्या वनडे सामन्यात अनेक विक्रम प्रस्थापित झाले. सर्वात वेगवान द्विशतक, एकाच सामन्यात ५ शतके, रोहित शर्माच्या १२००० धावा, ४०६ धावांचा यशस्वी पाठलाग.. यासह अनेक विक्रम आजच्या सामन्यात झाले.
भारतीय संघाने या सामन्यात संयमी सुरुवात केली. काही काळानंतर त्यानंतर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी मुक्तपणे फटकेबाजी केली. या टप्प्यावर शुभमन गिलने अवघ्या ६२ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. गिलने यापूर्वी तिरुवनंतपुरममध्येही शतक झळकावले होते.
कर्णधार शुभमन गिल याने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. गिलने पहिल्या चेंडूपासानूच विंडिजच्या गोलंदाजांवर वर्चस्व मिळवले. गिलसमोर विडिंजची गोलंदाजी दुबळी दिसत होती. गिलने वनडे क्रिकटेच्या इतिहासातील सर्वात वेगवान द्वशतक ठोकले. गिल याच्या द्विशतकी खेळीमुळे भारताने ४०६ धावांचे आव्हान सहज पार केले. गिलने आपल्या द्विशतकी खेळीमध्ये षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला. गिलने २५ चौकार आणि ८ षटकार ठोकल
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.