Sanju Samson : संजू सॅमसन CSK मध्ये एमएस धोनीची जागा घेणार? मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचा पत्ता कट होणार?

Sanju Samson News : संजू सॅमसन राजस्थानचा संघ सोडून चेन्नईकडून खेळणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच संजूला संघात घेऊन कर्णधार बनवण्याची तयारी असल्याचे संकेत सीएसकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिले आहेत.
Sanju Samson CSK
Sanju Samson CSKX
Published On

Sanju Samson CSK : संजू सॅमसन हा राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आहे. मागील अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये राजस्थानच्या संघाकडून खेळत आहे. आयपीएल २०२६ मध्ये संजू सॅमसन नव्या संघातून खेळणार असल्याचे म्हटले जात आहे. पुढच्या सीझनमध्ये संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दिसू शकतो असे म्हटले जात आहे. चेन्नई संघाच्या एका अधिकाऱ्याने याबाबतचे संकेत दिले आहे. संजू चेन्नईचा कर्णधार होऊ शकतो अशा चर्चाही रंगल्या आहेत.

Sanju Samson CSK
Kabaddi Player Death : प्रसिद्ध कबड्डीपटूचा दुदैवी मृत्यू, कुत्र्याच्या पिल्लाला वाचवणं जीवावर बेतलं

सीएसकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने संजू सॅमसन चेन्नईमध्ये येणार असल्याच्या चर्चांवर क्रिकबझला माहिती दिली. 'सलामी आणि यष्टीरक्षण अशी जबाबदारी चांगल्याप्रकारे सांभाळू शकेल अशा खेळाडूच्या आम्ही शोधात आहोत. जर संजू उपलब्ध असेल, तर आम्ही त्याला नक्कीच आमच्या संघात समाविष्ट करु. त्याच्या बदल्यात कोणाला ट्रेड केले जाईल यावर अजून निर्णय झाला नाहीये', असे अधिकाऱ्याने म्हटले आहे.

Sanju Samson CSK
Ind Vs Eng : लीड्सपाठोपाठ टीम इंडिया बर्मिंगहॅममध्ये हरणार? इंग्लंडचा संघ पुन्हा वरचढ ठरणार? कारण...

संजू सॅमसनला आयपीएलमध्ये खेळण्याचा भरपूर अनुभव आहे. त्याने आयपीएल लीगमध्ये १७७ सामन्यांमध्ये १३९.०५ च्या स्ट्राईक रेटने ४७९४ धावा केल्या आहेत. सलामीवीर आणि यष्टीरक्षण अशा दोन्ही गोष्टी तो एकाच वेळी सांभाळू शकतो. राजस्थान रॉयल्सच्या संघाला संजूने आयपीएल २०२२ मध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले होते. मागील अनेक दिवसांपासून संजू राजस्थान सोडून चेन्नईच्या संघात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Sanju Samson CSK
Cricket : एक-दोन नाही तर अनेक...; भारतीय खेळाडूचा पाय अजून खोलात, शारीरिक शोषणाचे गंभीर आरोप

आयपीएल २०२५ मध्ये संजू सॅमसन दुखापतीमुळे बराच वेळ संघाबाहेर होता. त्याची कामगिरी देखील फारशी चांगली नव्हती. आयपीएल २०२५ मध्ये संजूने ९ सामन्यांमध्ये ३५.६३ च्या सरासरीने फक्त २८५ धावा केल्या, ज्यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश होता. या सीझनमध्ये राजस्थान रॉयल्सचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नव्हता.

Sanju Samson CSK
Shocking: टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूसोबत वन नाईट स्टँड; ट्रान्स अभिनेत्रीचा शॉकिंग दावा; क्रिडाविश्व हादरलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com