Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरने जिगरी दोस्ताला केलं एप्रिल फूल; प्रँक पाहून मित्रानेही मारला डोक्यावर हात

Sachin Tendulkar Friend: सचिन तेंडुलकरने एप्रिल फूलच्या दिवशी मित्रासोबत केलेला मजेशीर प्रँक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचा हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू येईल.
Sachin Tendulkar Friend
Sachin Tendulkar Friendsaam tv
Published On

काल एक एप्रिलचा दिवस होता. या दिवशी आपल्या मित्रांना किंवा सहकाऱ्यांना एप्रिल फूल म्हणजेच त्यांना फसवलं जातं. दरम्यान या दिवशी क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर देखील मागे राहिलेला नाही. सचिन सोशल मीडियावर नेहमी एक्टिव्ह असतो. अशातच एक एप्रिलच्या दिवशी त्याने त्याच्या मित्रासोबत प्रँक केला आहे.

व्हिडीओ पाहून तुम्हालाही येऊन हसू

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सचिन अगदी त्याच्यासारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीच्या मदतीने आपल्या मित्रासोबत प्रँक करताना दिसतोय. त्याने व्हिडिओला कॅप्शन देताना लिहिलंय की, जर तुम्ही त्यांची मजा मस्करी केली नाही तर ते खरंच तुमचे मित्र आहेत का?

काय घडलंय नेमकं व्हिडीओमध्ये

सचिन त्याच्यासारख्या हुबेहुब दिसणाऱ्या व्यक्तीला खुर्चीवर बसतो. त्यानंतर, सचिनचा मित्र खोलीत येतो आणि खुर्चीवर बसलेल्या त्या माणसाला खरा तेंडुलकर समजून त्याला मागून मिठी मारण्याचा प्रयत्न करतो. यावेळी सचिनसारखा दिसणारा माणून रागावतो आणि मित्राला ओरडू लागतो. सचिन ही मजा मागे उभा राहून पाहत असतो. थोड्यावेळाने सचिन समोर येतो आणि मित्राला प्रँक असल्याचं सांगतो.

Sachin Tendulkar Friend
IPL 2026: 1...2...3 नाही तर तब्बल 11 चेंडू; अर्शदीप सिंगने हद्दच केली, फेकली सर्वात मोठी ओव्हर

कशी आहे सचिनची कारकिर्द

महान तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० टेस्ट, ४६३ वनडे आणि एक टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. तो सर्वाधिक टेस्ट सामने खेळणारा फलंदाज आहे. ३२९ टेस्ट डावांमध्ये त्याने ५३.७८ च्या सरासरीने १५,९२१ रन्स केले आहेत. ज्यामध्ये ५१ शतकं आणि ६८ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा सर्वोत्तम टेस्ट स्कोर २४८* होती.

Sachin Tendulkar Friend
IPL Schedule : १२ ठिकाणं, ५० सामने, ८ डबल हेडर मॅच; आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर

४५२ वनडे सामन्यांमध्ये सचिनने ४४.८३ च्या सरासरीने १८,४२६ रन्स केलेत. ज्यामध्ये ४९ शतकं आणि ९६ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा सर्वोत्तम स्कोर २००* होता. त्याच्या एकमेव दुसऱ्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने १० रन्स केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com