Asha Bhosle Funeral: आशा भोसले यांच्या आठवणींनी भारावला सचिन तेंडुलकर, अंत्यदर्शनावेळी अश्रू अनावर

Sachin Tendulkar emotional at Asha Bhosle funeral: दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. मुंबईत अंत्यदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात मान्यवर उपस्थित होते.
Asha Bhosle Funeral
Asha Bhosle Funeralsaam tv
Published On

भारतीय संगीतविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला असून दिग्गज गायिका आशा भोसले यांचं काल निधन झालं. रविवारी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थिती लावली. यावेळी क्रिकेटविश्वातील महान खेळाडू सचिन तेंडुलकर आणि पत्नी अंजली तेंडुलकर आशा ताईंच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले. यावेळी सचिनला अश्रू आनावर झाल्याचं पाहायला मिळालं.

सचिन तेंडुलकर जेव्हा आशा ताईंच्या पार्थिवाजवळ पोहोचला, तेव्हा तो काही काळ शांतपणे उभा राहिला. त्यावेळी त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सचिनने आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला. अंजली तेंडुलकरने कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना आधार दिला.

आशा ताईंना क्रिकेटची आवड

गायन क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या आशा भोसले यांना क्रिकेटचीही तितकीच आवड होती. त्यांचं आणि सचिन तेंडुलकरचं नातं अतिशय जिव्हाळ्याचं होतं. नुकत्याच झालेल्या अर्जुन तेंडुलकरच्या लग्नसोहळ्यात देखील आशा ताईंनी उपस्थिती लावली होती. हा त्यांचा शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम असल्याचं बोललं जातंय.

रश्मी ठाकरेंनाही अश्रू अनावर

लोअर परळमधील त्यांच्या निवासस्थानी आशा भोसले यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील अंत्यदर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी रश्मी ठाकरे यांनाही अश्रू अनावर झाले होते.

आशा भोसले यांचे अंत्यसंस्कार आज सायंकाळी 4 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत पार पडतील. या ठिकाणी त्यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. या प्रसंगी अनेक राजकीय नेते आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवर या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण देशभरातून आशा ताईंना श्रद्धांजली वाहण्यात येतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com