Gambhir- Sreesanth Fight: निवृत्तीनंतरही श्रीसंतचा राग तसाच!थेट गंभीरला भिडला; वादाचा Video व्हायरल

Gautam Gambhir- S Sreesanth Fight Video: हा सामना सुरु असताना भारताचे माजी खेळाडू एस श्रीसंत आणि गौतम गंभीर यांच्या जोरदार बाचाबाची झाली. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
Gautam Gambhir- S Sreesanth Fight Video
Gautam Gambhir- S Sreesanth Fight Videotwitter
Published On

Legends League Cricket 2023, Gambhir- Sreesanth Fight:

लिजेंड्स लीग २०२३ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेतील एलिमिनेटरचा सामना गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. सुरत येथील लालाभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियममध्ये पार पडलेल्या या सामन्यात इंडिया कॅपिटल्स संघाने १२ धावांनी विजय मिळवला.

दरम्यान हा सामना गौतम गंभीरमुळे चर्चेत आला आहे. हा सामना सुरु असताना भारताचे माजी खेळाडू एस श्रीसंत आणि गौतम गंभीर यांच्या जोरदार बाचाबाची झाली. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

बुधवारी झालेल्या सामन्यात गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात इंडिया कॅपिटल्स संघाचा कर्णधार गौतम गंभीर आणि गुजरात जायंट्स संघातील वेगवान गोलंदाज एस.श्रीसंत यांच्यात जोरदार वाद झाला. हे दोन्ही वरिष्ठ खेळाडू एकमेकांना खुन्नस देताना दिसून आले. या वादाचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय. नेमकं काय घडलं जाणून घ्या. (S Sreesanth -Gautam Gambhir Fight Video)

Gautam Gambhir- S Sreesanth Fight Video
IND vs AUS: ऋतुराजचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठा कारनामा! असा रेकॉर्ड करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

का झाला वाद?

या स्पर्धेतील एलिमिनेटरच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार गौतम गंभीरने सलामीला फलंदाजी करताना अर्धशतक झळकावलं. गंभीरने गुजरात जायंट्स संघातील गोलंदाज एस श्रीसंतच्या एका षटकात तुफान फटकेबाजी केली. हे श्रीसंथला सहन झालं नाही. तो गंभीरला डिवचण्याचा प्रयत्न करु लागला. श्रीसंथ आपल्याला डिवचण्याचा प्रयत्न करतोय हे पाहून गंभीरनेही त्याला खुन्नस दिली. (Latest sports updates)

तर झाले असे की, सामन्यातील दुसरे षटक टाकण्यासाठी श्रीसंत गोलंदाजीला आला होता. त्यावेळी गौतम गंभीर फलंदाजी करत होता. त्याने या षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. तर दुसऱ्या चेंडूवर त्याने चौकार मारला. हे पाहून श्रीसंतला राग अनावर झाला. या षटकातील तिसरा चेंडू निर्धाव केला. मात्र त्याचवेळी श्रीसंत गंभीरला खुन्नस देताना दिसून आला. श्रीसंतच्या या सामन्यातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ३ षटकांमध्ये ३५ धावा खर्च करत १ गडी बाद केला.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात गुजराच जायंट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंडिया कॅपिटल्सने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ गडी बाद २२३ धावा केल्या. या डावात गंभीरने सर्वाधिक ५१ धावांची खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात जायंट्सला ७ गडी बाद २११ धावा करता आल्या.

Gautam Gambhir- S Sreesanth Fight Video
Team India: भारताचा ग्रेटेस्ट बॅट्समन कोण? विराट-सचिन नव्हे तर पाकिस्तानी खेळाडूने या फलंदाजाचं घेतलं नाव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com