Gautam Gambhir News: आयपीएल २०२४ स्पर्धेपूर्वी मोठा उलटफेर! गौतम गंभीरचं KKR मध्ये कमबॅक

IPL 2024: आयपीएल २०२४ स्पर्धेपूर्वी गौतम गंभीरचं कोलकाता नाईट रायडर्स संघात कमबॅक झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
gautam gambhir
gautam gambhirsaam tv news
Published On

Gautam Gambhir Appointed As Mentor Of KKR:

आयपीएल २०२४ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी मोठा फेरबदल पाहायला मिळाला आहे. गौतम गंभीरचं पुन्हा एकदा कोलकाता नाईट रायडर्स संघात कमबॅक झालं आहे. गंभीरने लखनऊ सुपर जायंट्स संघाची साथ सोडली आहे. आगामी आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी त्याला कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या मेंटॉरची जबाबदारी देण्यात आली आहे.

गौतम गंभीर हा कोलकाता नाईट रायडर्स संघाचा माजी खेळाडू आहे. त्याने २०११ पासून ते २०१७ पर्यंत कोलकाता नाईट रायडर्स संघाचं नेतृत्व केलं. त्यानंतर त्याने या संघाची साथ सोडली होती. आता ६ वर्षांनंतर पुन्हा एकदा गौतम गंभीरचं कोलकाता नाईट रायडर्स संघात कमबॅक झालं आहे. (Latest sports updates)

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती..

गौतम गंभीरने बुधवारी (२२ नोव्हेंबर) एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडणार आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहीले की, 'लखनऊ सुपर जायंट्स संघासोबत माझा प्रवास आता संपला आहे. या संघासाठी काम करताना मला खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांकडून चांगला सपोर्ट मिळाला. मी लखनऊ सुपर जायंट्स संघाचे मालक संजीव गोयंका यांचे आभार मानतो. त्यांची लिडरशीप अतिशय उत्कृष्ट राहिली आहे. मी आशा करतो की, लखनऊ सुपर जायंट्सचा संघ यापुढेही अशीच कामगिरी करेल, शुभेच्छा..'

gautam gambhir
Rohit Sharma Statement: 'इथंच आमचं चुकलं..' फायनल गमावल्यानंतर निराश झालेल्या रोहितने सांगितलं पराभवाचं नेमकं कारण

भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर हा कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार आहे. तर चंद्रकांत पंडित हे संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. आता गंभीर या दोघांसोबत काम करताना दिसून येणार आहे. तर दुसरीकडे लखनऊ सुपर जायंट्स संघाला मोठा धक्का बसला आहे. गंभीरसह मुख्य प्रशिक्षक अँडी प्लावरनेही संघाची साथ सोडली आहे.

gautam gambhir
Bhuvneshwar Kumar: वर्ल्डकपसह 'या' दिग्गज गोलंदाजाची कारकीर्दही संपली! लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकणार रामराम ?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com