वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ तिसऱ्यांदा वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
तर ऑस्ट्रेलियाला सहाव्यांदा वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकण्याची संधी असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने भारतीय संघातील गेम चेंजर खेळाडूचं नाव सांगितलं आहे.
हा आहे सर्वात मोठा गेमचेंजर...
या स्पर्धेत रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी भारतीय संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं आहे. मात्र गौतम गंभीरने श्रेयस अय्यरला मॅचविनर खेळाडू असं म्हटलं आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानूसार गौतम गंभीर म्हणाला की, 'माझ्यासाठी श्रेयस अय्यर सर्वात मोठा गेमचेंजर खेळाडू आहे. तो दुखापतग्रस्त होता त्यानंतर संघात संधीच्या शोधात होता. सेमीफायनलसारख्या महत्वाच्या सामन्यात त्याने ७० चेंडूत शतक पूर्ण केलं. जेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात ग्लेन मॅक्सवेल आणि अॅडम झाम्पा गोलंदाजी करतील त्यावेळी श्रेयस अय्यर मोलाची भूमिका बजावणार आहे.'
वर्ल्डकप स्पर्धेत बॅक टू बॅक शतकं..
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात श्रेयस अय्यरने अतिशय महत्वाची खेळी केली. शुभमन गिलने रिटायर्ड हर्ट होऊन मैदान सोडल्यानंतर अय्यर फलंदाजीला आला होता. त्याने विराटला साथ देत आक्रमाक खेळी केली.
या खेळीदरम्यान त्याने ७० चेंडूंचा सामना करत ४ चौकार आणि ८ गगनचुंबी षटकार मारले. या सामन्यात त्याने १०५ धावांची खेळी केली. तर नेदरलँडविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने १० चौकार आणि ५ षटकारांच्या साहाय्याने १२८ धावांची तुफानी खेळी केली होती. या स्पर्धेत त्याने बॅक टू बॅक २ शतके झळकावली. (Latest sports updates)
ऑस्ट्रेलियाला धुळ चारण्याची सुवर्णसंधी..
भारतीय संघ १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. २००३ मध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
त्यामुळे यावेळी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन पराभवाचा बदला घेण्याची संधी असणार आहे. २०११ मध्ये भारतीय संघाने श्रीलंकेला पराभूत करत जेतेपदाला गवसणी घातली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.