ind vs aus
ind vs aussaam tv new

IND vs AUS, Final: अहमदाबादमध्ये वर्ल्डकप फायनलचा थरार! भारतापेक्षा ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड टेन्शन वाढवणारा; पाहा आकडेवारी

India vs Australia, World Cup Final: या मैदानावर भारतीय संघापेक्षा ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे.
Published on

India vs Australia Head To Head Record:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील फायनलचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यावर आतापर्यंत भरपूर सामने खेळवले गेले आहेत. भारतीय संघाचा रेकॉर्ड या मैदानावर दमदार राहिला आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड त्याहून दमदार राहिला आहे.

असा राहिलाय भारतीय संघाचा रेकॉर्ड...

भारतीय संघाचा या मैदानावरील रेकॉर्ड पाहिला तर, १९८४ पासून २०२३ पर्यंत भारतीय संघाने या मैदानावर १९ सामने खेळले आहेत. यादरम्यान ११ सामन्यांमध्ये भारतीय संघाला विजय मिळवता आला आहे. तर ८ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मैदानावर भारतीय संघाची विजयाचा रेकॉर्ड ५७.८९ टक्के इतका राहिला आहे. (India vs Australia head to head record)

तर ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड पाहिला तर, ऑस्ट्रेलियाने या मैदानावर आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. यादरम्यान ऑस्ट्रेलियाला ४ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. तर २ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाचा विजयाचा रेकॉर्ड ६६.६६ टक्के इतका राहिला आहे. (Latest sports updates)

ind vs aus
Temba Bavuma Statement: 'हाच टर्निंग पॉइंट ठरला...' सामन्यानंतर कर्णधार टेम्बा बावूमाने सांगितलं नेमकं कुठे चुकलं

भारत- ऑस्ट्रेलिया हेड टु हेड रेकॉर्ड...

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हे दोन्ही संघ ३ वेळेस आमने सामने आले आहेत. १९८४ मध्ये झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार खेळ करत ७ गडी राखून एकतर्फी विजय मिळवला होता. त्यानंतर १९८६ मध्ये हे दोन्ही संघ याच मैदानावर आमने सामने आले होते. (Team India record at narendra modi stadium)

या सामन्यात भारतीय संघाने पराभवाचा बदला घेत ५२ धावांनी विजय मिळवला होता. २०११ मध्ये हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला धुळ चारली होती. त्यामुळे या मैदानावर भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार रेकॉर्ड राहिला आहे. (Australia record at narendra modi stadium)

ind vs aus
World Cup 2023: पराभव जिव्हारी लागला, सेमीफायनल गमावताच दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंच्या डोळ्यात आलं पाणी, VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com