पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेने वर्ल्डकप फायनल खेळण्याची संधी गमावली आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर ३ गडी राखून विजय मिळवला आहे. यासह ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये एन्ट्री केली आहे.
या सामन्यातील पहिल्या डावात पावसाने तर दुसऱ्या डावात ट्रेविस हेडने आपल्या फलंदाजी धुमाकूळ घातला. लो स्कोरिंग सामना असतानाही दक्षिण आफ्रिकेने तोडीस तोड खेळ केला. मात्र शेवटी त्यांना पराभव पत्करावा लागला.
दक्षिण आफ्रिकेतील फलंदाज या महत्वाच्या सामन्यात पूर्णपणे फ्लॉप ठरले. एकट्या डेव्हिड मिलरच्या शतकी खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेला २१२ धावा करता आल्या. हा सामना दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी ४८ व्या षटकापर्यंत खेचला. मात्र या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावूमा निराश असल्याचं दिसून आलं आहे.
या पराभवानंतर बोलताना टेम्बा बावूमा म्हणाला की, ' या सामन्यात जे घडलं ते शब्दात सांगणं कठीण आहे. ऑस्ट्रेलियाचं अभिनंदन आणि फायनलसाठी शुभेच्छा. ते या सामन्यात आघाडीवर होते. त्यामुळे ते विजयाचे हकदार आहेत. आम्ही शेवटपर्यंत झुंज दिली. मात्र आम्ही दोन्ही डावात जी सुरुवात केली ती खूप निराशाजनक होती. हाच या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला.'
तसेच तो पुढे म्हणाला की, ' हवामान आणि विपक्षी संघातील गोलंदाजी आक्रमक दोन्ही भयावह होतं. आम्ही दबाव टाकत या दोन्ही गोष्टींशी लढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना दबाव बनवून ठेवण्यात यश आलं. आम्ही सामन्यात कमबॅक केलं होतं. मात्र त्याचवेळी क्लासेन आऊट झाला. तो शेवटच्या षटकांमध्ये घातक ठरू शकला असता. शेवटी डेव्हिड मिलरने दाखवून दिलं की, एक खेळाडू म्हणून तो काय करू शकतो.' (Latest sports updates)
गोलंदाजांबद्दल बोलताना तो म्हणाला की, ' आम्हाला सुरुवातीला चांगली गोलंदाजी करायची होती. त्यानंतर कमबॅक केलं. शम्सीने दमदार गोलंदाजी केली. आम्ही तोडीस तोड उत्तर दिलं मात्र आम्हाला आणखी खूप काही करण्याची गरज होती.'
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.