AUS vs SA: विश्वचषकात कांगारुंची दादागिरी सिद्ध, दक्षिण आफिक्रेवर पुन्हा 'चोकर्स'चा शिक्का

AUS vs SA World Cup: कांगारुंनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विश्वचषकातील दादागिरी सिद्ध केली.
AUS vs SA
AUS vs SAtwitter
Published On

SA vs AUS World Cup 2023 Semifinal:

विश्वचषकातील उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत झालेला दुसरा सामना रोमहर्षक झाला. या सामन्यात कांगारुंनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विश्वचषकातील दादागिरी पुन्हा सिद्ध केली. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने स्पर्धेतील महत्वाच्या सामन्यात हरण्याची परंपरा कायम ठेवली. उपांत्य फेरीत कांगारुंचा विजय झाल्याने आता फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारतामध्ये लढत होणार आहे. (Latest Marathi News)

२०२३ : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरी

विश्वचषकात चांगली कामगिरी करूनही महत्वाच्या सामन्यात हारणाऱ्या संघाला चोकर्स म्हटलं जातं. क्रिकेट विश्वात दक्षिण आफ्रिकेवर 'चोकर्स' असल्याचा शिक्का आहे. यंदाही झालेल्या विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करून उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर तीन गडी राखून पराभव केला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

AUS vs SA
World Cup: अखेर २०१९ चा बदला घेतला! शमीच्या भेदक माऱ्यापुढे न्यूझीलंड ढेर; तिसऱ्या विश्वचषकापासून टीम इंडिया एक पाऊल दूर

११९२ : इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरी

१९९२ साली झालेल्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेने एन्ट्री करत चांगली कामगिरी करत सर्वांना आश्चर्यचकीत केलं होतं. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला १३ चेंडूत २२ धावांची गरज असताना पाऊस आल्याने सामन्याचं सारंच गणित बिघडलं. त्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला नियमानुसार पराभवाला सामारे जावं लागलं.

१९९९ : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरी

१९९९ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत २१३ धावा केल्या होत्या. त्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या नऊ गडी गमावून १९८ धावा झाल्या. त्यानंतर लान्स क्लूजनरने आक्रमक खेळी करत संघाला २१३ धावा केल्या.

या सामन्यात एक धाव काढत असताना एलेन डोनाल्ड धावचीत झाला. त्यामुळे सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची धावांची सरासरी कमी असल्याने ऑस्ट्रेलियाला विजयी घोषित करण्यात आलं.

AUS vs SA
World Cup 2023: दक्षिण आफ्रिका पुन्हा ठरली 'चोकर्स' ! भारत - ऑस्ट्रेलियात रंगणार वर्ल्डकप २०२३ फायनल

२०१५ : न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरी

२०१५ साली झालेल्या विश्वचषकातील उपांत्य फेरीतील सामन्यात न्यूझीलंडला पावसामुळे ४३ षटकात २९८ धावांचं आव्हान मिळालं होतं. न्यूझीलंडने ४१ षटकात ६ गडी गमावले होते. त्यानंतर पुढे न्यूझीलंडला शेवटच्या षटकात १२ धावा हव्या होत्या. या षटकाच्या पाचव्या चेंडूत षटकार ठोकून न्यूझीलंडने सामना जिंकला. विजयाचा घास त्यांच्या तोंडातून हिसकावल्याने दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंच्या डोळ्यातून पाणीच आलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com