IPL 2025: रिषभ पंत दिल्लीची साथ सोडून RCB कडून खेळणार? पोस्ट तुफान व्हायरल

Rishabh Pant In RCB: दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार रिषभ पंत आगामी हंगामात रॉयल चॅलेंजर्ल बंगळुरुकडून खेळणार असल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
IPL 2025: रिषभ पंत दिल्लीची साथ सोडून RCB कडून खेळणार? पोस्ट तुफान व्हायरल
VIART KOHLI RISHABH PANTTWITTER
Published On

आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. या मेगा ऑक्शनपूर्वी अनेक चर्चा सुरू आहेत. काही संघातील स्टार खेळाडू आगामी हंगामात इतर संघाकडून खेळताना दिसू शकतात, असं म्हटलं जातंय.

भारताचा स्टार यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतबद्दलची देखील एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात रिषभने थेट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या टीम मॅनेजमेंटसोबत संपर्क केल्याचे म्हटले जात आहे. हे खरंच घडलंय का? काय आहे यामागचं सत्य? जाणून घ्या.

रिषभ दिल्लीची साथ सोडणार?

रिषभ पंत हा दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार आहे. मात्र आगामी हंगामापूर्वी अशी चर्चा सुरू आहे की, रिषभ पंत दिल्लीची साथ सोडणार आहे. तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या टीम मॅनेजमेंटच्या संपर्कात आहे. एका युझरने पोस्ट शेअर करत लिहिले की, ' रिषभ पंतने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला संपर्क केलाय. त्याने या आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या मॅनेजरच्या साहाय्याने संपर्क केला. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने त्याला नकार कळवला आहे. कारण विराट कोहलीला रिषभ पंत आपल्या संघात नकोय.'

IPL 2025: रिषभ पंत दिल्लीची साथ सोडून RCB कडून खेळणार? पोस्ट तुफान व्हायरल
IND vs BAN : नाणेफीकीचा कौल भारताच्या बाजूने, बांगलादेशच्या संघात दोन बदल, पाहा प्लेईंग ११

ही खोटी पोस्ट व्हायरल होताच, रिषभ पंतचाही पारा चढला. त्याने हीच पोस्ट रिशेअर करत लिहिले की, ' खोटी बातमी.. तुम्ही सोशल मीडियावर खोट्या बातम्या का पसरवतात. थोडं हुशार व्हा. काही कारण नसताना असं वातावरण तयार करू नका. हे पहिल्यांदा घडलेलं नाही आणि मला विश्वास आहे की शेवटचंही नसेल. कृपा करून, तुमच्या सूत्रांकडून पुन्हा एकदा खात्री करून घ्या. बाकी सर्व गोष्टी तुमच्यावर अवलंबून आहेत. हे केवळ तुमच्यासाठी नाहीतर त्या लोकांसाठी आहे, जे खोट्या बातम्या पसरवतात.'

IPL 2025: रिषभ पंत दिल्लीची साथ सोडून RCB कडून खेळणार? पोस्ट तुफान व्हायरल
IND vs BAN 2nd Test : भारत-बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या टेस्टपूर्वी दिग्गज खेळाडूने जाहीर केली निवृत्ती; 'हा' ठरणार शेवटचा सामना

बांगलादेशविरुद्ध दमदार कमबॅक

भारताचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतचा डिसेंबर २०२२मध्ये कार अपघात झाला होता. त्यामुळे काही महिने त्याला क्रिकेटपासून दूर राहावं लागलं होतं. पूर्णपणे फिट झाल्यानंतर त्याने आयपीएल २०२४ स्पर्धेतून कमबॅक केलं. त्यानंतर आता त्याला बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतून कमबॅक करण्याची संधी मिळाली आहे. कमबॅकनंतर पहिल्याच सामन्यात त्याने शतक झळकावलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com