

Virat Kohli injury update today : लखनौ आणि आरसीबी यांच्यामध्ये आज आयपीएलच्या मैदानात लढत होणार आहे. तुफान फॉर्मात असलेली आरसीबी अन् अडखळणारा लखनौ, यांच्यातील लढतीकडे क्रीडाविश्वाचे लक्ष लागलेय. पण आजच्या सामन्यात स्टार फलंदाज विराट कोहली खेळणार का? याची उत्सुकताही शिगेला पोहचली आहे. कारण, मुंबईविरोधात वानखेडेवर (RCB Royal Challengers Bangalore ) झालेल्या सामन्यावेळी विराट आजारी होती, त्यासोबतच त्याला दुखापतही झाली होती. दुखापतीमुळे वानखेडेवर विराट फील्डिंगसाठीही उतरला नव्हता. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात विराट खेळणार का? असा सवाल उपस्थित होतोय. याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
आयपीएल २०२६ मध्ये विराट कोहली भन्नाट फॉर्मात आहे. रविवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान विराट कोहलीच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्याशिवाय तो तापाने फणफणत होता. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आज होणाऱ्या सामन्यासाठी विराट कोहली उपलब्ध असेल का? हा चर्चेचा विषय बनला आहे. विराट कोहली आजच्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. कारण आरसीबीच्या सराव सत्रात विराट कोहलीने हजेरी लावली होती.
विराट कोहली नेहमीप्रमाणे सराव सत्रात सहभागी झाला. त्याने कसून सराव केला. मैदानावर सहकाऱ्यांशी गप्पा मारल्या. पण चितेंची बाब म्हणजे, सराव करतानाही विराट कोहलीच्या डाव्या गुडघ्याला घट्ट पट्टी बांधलेली दिसली. त्यामुळे त्याच्या खेळण्यावर सपेन्स कायम आहे. दुसरीकडे, एलएसजीने विराट आणि विल्यमसन यांचा एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यामध्येही विराट कोहली डाव्या गुडघ्याला पट्टी बांधून विल्यमसनला भेटल्याचे दिसतेय.
घोट्याला पट्टी बांधलेली असूनही विराट कोहलीने नेटमध्ये कसून सराव केला. त्याने मनसोक्त फलंदाजी केली. पण विराट आज खेळणार की नाही, हे अद्याप निश्चित नाही. नाणेफेकीवेळीच विराट कोहली खेळणार की नाही, हे स्पष्ट होईल. दरम्यान, आयपीएल २०२६ मध्ये विराट कोहलीने ४ सामन्यांमध्ये ५९.६६ च्या सरासरीने आणि १६२.७२ च्या स्ट्राइक रेटने १७९ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या ६९* आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू : फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, सुयश शर्मा, रसिक सलाम दार, व्यंकटेश बेंगल, जॅकबेल सिंग, जोश हेझलवूड, जॉर्डन कॉक्स, नुवान तुषारा, विकी ओस्तवाल, विहान मल्होत्रा, अभिनंदन सिंग, कनिष्क चौहान
लखनौ सुपर जायंट्स : एडन मार्कराम, मिशेल मार्श, ऋषभ पंत (w/c), आयुष बडोनी, निकोलस पूरन, अब्दुल समद, मुकुल चौधरी, जॉर्ज लिंडे, मोहम्मद शमी, आवेश खान, दिग्वेश राठी, प्रिन्स यादव, मणिमरन सिद्धार्थ, शाहबाज अहमद, मॅट ब्रेजेड, जोश इंग्लिस, हिम्मत सिंग, मोहसीन खान, अर्जुन तेंडुलकर, आकाश सिंग, अक्षत रघुवंशी, अर्शीन कुलकर्णी, नमन तिवारी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.