SRH vs DC सामन्यानंतर पॉईंट्स टेबलचं समीकरण बदललं; 'या' ४ टीम्स playoffs गाठण्याची शक्यता

IPL 2025 Points Table: आयपीएलमध्ये सोमवारी दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना खेळवण्यात आला. हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे दोन्ही टीम्सना एक-एक पॉईंट देण्यात आला.
IPL 2025 Points Table
IPL 2025 Points Tablesaam tv
Published On

IPL 2025 playoffs scenario : सोमवारी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना खेळवण्यात आला होता. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना रद्द झाला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना १३३ रन्स केले होते. मात्र त्यानंतर हैदराबादच्या टीमला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही.

अंपायर्सने ग्राऊंडवर पाणी असल्याने सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. सामना रद्द झाल्याचं घोषित करताच दोन्ही टीम्सना एक-एक पॉईंट देण्यात आला. दरम्यान या सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये कसा बदल झाला आहे ते पाहूयात.

IPL 2025 Points Table
SRH Vs DC सामना पावसामुळे रद्द, काव्या मारनच्या सनरायजर्स हैदराबादचं IPL 2025 मधून पॅकअप

दिल्ली कॅपिटल्स पाचव्या स्थानावर

दिल्ली कॅपिटल्सची टीम सध्याच्या स्थितीत पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे. या टीमने आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत. तर ६ सामन्यामध्ये त्यांनी विजय मिळवला असून ४ सामन्यांमध्ये पराभव स्विकारला आहे. १३ पॉईंट्ससह या टीमचा नेट रनरेट प्लस 0.362 आहे. जर या टीमला प्लेऑफचं तिकीट मिळवायचं असेल तर अजून उर्वरित ३ सामने जिंकायचे आहेत.

पंजाब किंग्स दुसऱ्या स्थानावर

यंदाच्या आयपीएल २०२५ च्या पॉइंट्स टेबलमध्ये आरसीबीची टीम पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने एकूण ११ सामने खेळले असून त्यापैकी त्याने ८ सामने जिंकले आहेत. १६ गुणांसह त्याचा नेट रन रेट प्लस ०.४८२ आहे. पंजाब किंग्जची टीम दुसऱ्या क्रमांकावर आहे. टीमने ११ पैकी ७ सामने जिंकले आहेत. तर यावेळी एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्याचा १५ गुणांसह नेट रन रेट प्लस ०.३७६ आहे.

IPL 2025 Points Table
Kavya Maran : धावा काढताना गोंधळ, ट्रिस्टन स्टब्समुळे बिचारा विपराज निगम रनआउट झाला अन् काव्या मारनचा चेहरा खुलला

तिसऱ्या स्थानावर मुंबई इंडियन्स

मुंबई संघ तिसऱ्या स्थानावर असून त्यांनी ११ पैकी ७ सामने जिंकले आहेत. त्याचा नेट रन रेट १.२७४ आहे आणि त्याचे १४ गुण आहेत. आरसीबी, पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या ४ टीम्स पॉइंट टेबलच्या टॉप-४ मध्ये कायम आहेत. या टीम्स प्लेऑफमध्ये पोहोचणार असल्याची शक्यता आहे. याशिवाय केकेआर आणि लखनऊ सुपर जायंट्सची टीम देखील प्लेऑफच्या शर्यतीत आहेत.

IPL 2025 Points Table
Pat Cummins : ३ ओव्हर्सच्या पहिल्याच चेंडूवर ३ विकेट्स; पॅट कमिन्सने दिल्लीचं कंबरडं मोडलं

तीन टीम झाल्या बाहेर

सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या टीम प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्या आहेत. यंदाच्या सिझनमध्ये या टीम्सना चांगली कामगिरी करता आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com