
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना पावसामुळे रद्द झाला आहे. हैदराबाद आणि दिल्ली या दोन्ही संघाना एक-एक गुण मिळाला आहे. पण सामना रद्द झाल्याने सनरायजर्स हैदराबादचे २०२५ मधील आव्हान संपुष्टात आले आहे. चेन्नई, राजस्थाननंतर प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडणारा हैदराबाद हा तिसरा संघ आहे. आजच्या सामन्यानंतरही १३ गुणांसह दिल्ली पॉईंट्स टेबलवर पाचव्या स्थानी आहे.
आयपीएल २०२५ मधला ५५ व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ आमनेसामने आले. हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू फलंदाजी करण्यासाठी उतरले. सुरुवातीला धक्के मिळूनही दिल्लीच्या संघाने २० ओव्हर्समध्ये १३३ धावा केल्या.
दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या ५ ओव्हर्समध्ये पॅट कमिन्सने करुण नायर (०), फाफ डू प्लेसिस (३) आणि अभिषेक पोरेल (८) बाद केले. कर्णधार अक्षर पटेलने फक्त ६ धावा केल्या. केएल राहुलही १० धावा करुन माघारी परतला. पुढे गोंधळामुळे विपराज निगम १८ धावांवर रनआउट झाला.
१२ ओव्हरपर्यंत दिल्लीची धावसंख्या ६३/६ अशी होती. ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोष शर्मा यांनी खेळ सावरला. दोघांनी प्रत्येकी ४१-४१ धावा करत दिल्लीचा डाव १३० धावांच्या पुढे नेला. दिल्लीची फलंदाजी संपल्यानंतर राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पावसाने एन्ट्री मारली. बराच वेळाने पाऊस थांबला पण वेळ झाल्याने हा सामना रद्द करण्यात आला.
दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग ११ -
फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव, टी नटराजन
(इम्पॅक्टचे पर्याय - आशुतोष शर्मा, जेक फ्रेझर मॅकगर्क, समीर रिझवी, मुकेश कुमार, मोहित शर्मा)
सनरायझर्स हैदराबादची प्लेईंग ११ -
अभिषेक शर्मा, इशान किशन, सचिन बेबी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, झीशान अन्सारी, एशान मलिंगा
(इम्पॅक्टचे पर्याय - ट्रॅव्हिस हेड, हर्ष दुबे, राहुल चहर, वियान मुल्डर, मोहम्मद शमी)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.