Kavya Maran : धावा काढताना गोंधळ, ट्रिस्टन स्टब्समुळे बिचारा विपराज निगम रनआउट झाला अन् काव्या मारनचा चेहरा खुलला

SRH Vs DC IPL 2025 : राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना रंगला आहे. हा सामना पाहण्यासाठी हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारन स्टेडियमवर पोहोचली आहे.
Kavya Maran SRH Vs DC IPL 2025
Kavya Maran SRH Vs DC IPL 2025X
Published On

SRH Vs DC Live : सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना रंगला आहे. या सामन्यामध्ये हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत कमिन्सने करुण नायरच्या रुपाने दिल्लीला पहिला धक्का दिला. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये फाफ डू फ्लेसिस आणि पाचव्या ओव्हरमध्ये अभिषेक पोरेल यांना बाद केले.

Kavya Maran SRH Vs DC IPL 2025
Pat Cummins : ३ ओव्हर्सच्या पहिल्याच चेंडूवर ३ विकेट्स; पॅट कमिन्सने दिल्लीचं कंबरडं मोडलं

पॅट कमिन्सनंतर हर्षल पटेलने अक्षर पटेल (६ धावा) आणि जयदेव उनादकटने केएल राहुलला (१० धावा) माघारी पाठवले. त्यानंतर विपराज निगम आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी मोर्चा सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण तेराव्या ओव्हरमध्ये धाव काढताना गोंधळामुळे विपराज निगमला माघारी जावे लागले. विपराज निगम आउट झाल्यानंतर स्टेडियममध्ये बसलेली काव्या मारन आनंदाने नाचू लागली.

Kavya Maran SRH Vs DC IPL 2025
मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा होतोय आरोप

नेमकं काय झालं?

झीशान अन्सारी तेराव्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आला. तेव्हा ट्रिस्टन स्टब्स स्ट्राईकवर होता. अन्सारीने टाकलेल्या चेंडूवर स्टब्सने शॉट मारला आणि चेंडू मिड विकेटला गेली. तेथे अनिकेत वर्माने चेंडू पकडला आणि अन्सारीच्या दिशेने फेकला. तेव्हा स्टब्स आणि विपराज यांनी एक धाव काढली होती. चेंडू अन्सारीने फेकला, त्या वेळेस स्ट्रब्सने क्रीज सोडली होती. पण विपराज धावला नव्हता. स्टब्स धावल्यानंतर अन्सारीने थ्रो पकडून विपराज निगमला रनआउट केले. १७ चेंडूत १८ धावा करुन विपराज निगमला माघारी परतावे लागले.

दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग ११ -

फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव, टी नटराजन

इम्पॅक्टचे पर्याय - आशुतोष शर्मा, जेक फ्रेझर मॅकगर्क, समीर रिझवी, मुकेश कुमार, मोहित शर्मा

सनरायझर्स हैदराबादची प्लेईंग ११ -

अभिषेक शर्मा, इशान किशन, सचिन बेबी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, झीशान अन्सारी, एशान मलिंगा

इम्पॅक्टचे पर्याय - ट्रॅव्हिस हेड, हर्ष दुबे, राहुल चहर, वियान मुल्डर, मोहम्मद शमी

Kavya Maran SRH Vs DC IPL 2025
Ind Vs Eng : आता रोहित शर्मा नाहीतर मला संधी हवी, इंग्लंड दौऱ्याआधी वरिष्ठ खेळाडूने व्यक्त केली इच्छा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com