Ind Vs Eng : आता रोहित शर्मा नाहीतर मला संधी हवी, इंग्लंड दौऱ्याआधी वरिष्ठ खेळाडूने व्यक्त केली इच्छा

India Vs England : आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामने खेळले जाणार आहेत. २० जून ते ३१ जुलै या कालावधीत कसोटी मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे.
rohit sharma
rohit sharmax
Published On

IPL 2025 संपल्यानंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. जून महिन्यामध्ये भारत विरुद्ध इंग्लंड अशी ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाईल. या मालिकेमध्ये रोहित शर्माकडे भारतीय संघाचे कर्णधारपद नसेल अशा चर्चा रंगल्या आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अनुषंगाने रोहितकडे नेतृत्त्व राहील की नाही हे निश्चित नसल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्त्वामध्ये भारतीय संघाचा दोन कसोटी मालिकांमध्ये पराभव झाला होता. भारत विरुद्ध न्यूझीलंड ही कसोटी मालिका भारताने ०-३ च्या फरकाने गमावली होती. तर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्येही भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. यामुळे इंग्लंड दौऱ्यावर भारताच्या कर्णधारपदाची जबाबदारी रोहितकडे दिली जाईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

rohit sharma
Ayush Mhatre : वैभव सूर्यवंशीला फॉलो करु नकोस, आयुष म्हात्रेला वडिलांनी का दिला सल्ला?

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा कर्णधारपदी कायम राहणार की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. पण एका वरिष्ठ खेळाडूनेही कर्णधारपदावर दावा केल्याची माहिती समोर आली आहे. टीम इंडियामधील कोणत्या खेळाडूने कर्णधार होण्याची इच्छा व्यक्त केल्याचे अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान कर्णधारपदाविषयी बीसीसीआय लवकरच घोषणा करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

rohit sharma
Mohammed Shami : १ कोटी दे नाहीतर...; मोहम्मद शमीला ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी, क्रिकेटरच्या भावाची पोलिसात धाव

निवड समितीने कसोटी संघातील उपकर्णधार बदलला जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. सध्या रोहित शर्माकडे कर्णधारपद, तर जसप्रीत बुमराहकडे उपकर्णधारपद आहे. बुमराहवर वर्कलोड येत असल्याचे म्हणत उपकर्णधारपदाची जबाबदारी इतर खेळाडूकडे सोपवण्यात येईल असे बीसीसीआयच्या सूत्रांनी म्हटले आहे. तेव्हा जसप्रीत बुमराहच्या जागी शुबमन गिलकडे उपकर्णधारपद दिले जाईल अशा चर्चा रंगल्या आहेत. काहीजण गिलकडे उपकर्णधारपद नाही, तर कर्णधारपदाची धुरा सोपवली जाईल असेही म्हणत आहेत.

rohit sharma
'अरे धोनीला एकदा कॉल कर..' वीरुचा रिषभ पंतला मायेचा सल्ला; ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणतो, 'किपिंग सोड..'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com