Mohammed Shami : १ कोटी दे नाहीतर...; मोहम्मद शमीला ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी, क्रिकेटरच्या भावाची पोलिसात धाव

Mohammed Shami News : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीच्या ई-मेलमध्ये १ कोटी दे नाहीतर जीवानीशी जाशील असा मजकूर आहे.
Mohammed Shami
Mohammed ShamiX
Published On

Mohammed Shami Death Threat : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. रविवारी (४ मे) राजपूत सिंधर नावाच्या ईमेल आयडीवरुन धमकीचा मेल पाठवण्यात आला. मेलमध्ये १ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. या घटनेनंतर शमीचा भाऊ मोहम्मद हसीबने अमरोहा पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि एफआयआर नोंदवण्याची मागणी केली.

अमरोहा पोलीस ठाण्यातील पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर, सायबर सेलने या प्रकरणात तात्काळ कारवाई करत सायबर पोलीस स्थानकामध्ये एफआयआर नोंदवला. धमकीचा मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत. मोहम्मद शमी सध्या आयपीएलमध्ये व्यग्र आहे. धमकी मिळाल्यानंतर शमीचे कुटुंबीय चिंतातूर झाले आहे. याआधीही मोहम्मद शमीला 'तुला मारुन टाकू' असे म्हणत धमकावण्यात आले होते. या एकूण प्रकरणामुळे क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

Mohammed Shami
योगायोगाने क्रिकेटर बनला, आता काव्या मारनच्या संघात मिळालं स्थान; कोण आहे रणजी गाजवणारा हर्ष दुबे?

अमर उजालाने दिलेल्या माहितीनुसार, 'जर १ कोटी रुपये दिले नाहीत, तर शमीला मारुन टाकू' असे ईमेलमध्ये नमूद केले आहेत. मोहम्मद शमीच्या भावाने मोहम्मद हसीबने सर्वात आधी धमकीचा ईमेल पाहिला आणि त्यानेच अमरोहाच्या एसपींना या प्रकरणाची माहिती दिली. धमकीचा ईमेल पाठवणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करणारे तक्रार पत्र त्याने सादर केले.

Mohammed Shami
'अरे धोनीला एकदा कॉल कर..' वीरुचा रिषभ पंतला मायेचा सल्ला; ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणतो, 'किपिंग सोड..'

अमरोहा पोलिसांनी सायबर सेलला ईमेलची चौकशी करण्याचे आणि आरोपींची ओळख पटवण्याचे आदेश दिले आहेत. तज्ज्ञांच्या मदतीने ईमेलचा स्त्रोत आणि त्याची सत्यता तपासली जाईल असे सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या धमकी प्रकरणानंतर चाहत्यांनी मोहम्मद शमीच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी अशी मागणी केली आहे. शमीच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलली जातील असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

Mohammed Shami
Ayush Mhatre : वैभव सूर्यवंशीला फॉलो करु नकोस, आयुष म्हात्रेला वडिलांनी का दिला सल्ला?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com