World Cup 2023: न्यूझीलंड जिंकूनही पाकिस्तानला मिळणार सेमीफायनलचं तिकीट! वाचा कसं असेल समीकरण

Pakistan World Cup Semi Final Qualification Scenario: पाहा कसं असेल पाकिस्तानचं वर्ल्डकप स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये जाण्याचं समीकरण.
pakistan cricket team
pakistan cricket teamtwitter
Published On

Pakistan World Cup Semi Final Qualification Scenario:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धा आता रोमांचक वळणावर येऊन ठेपली आहे. आतापर्यंत या स्पर्धेतील ३७ सामने खेळवले गेले आहेत. या सामन्यांनंतर केवळ २ संघांना सेमीफायनलचं कन्फर्म तिकीट मिळालं आहे. तर उर्वरीत संघ अजूनही वेटिंग लिस्टमध्ये आहेत.

ऑस्ट्रेलियाचा संघ या शर्यतीत आघाडीवर आहे. तर श्रीलंका आणि नेदरलँडचा संघ सर्वात शेवटी आहे. आतापर्यंत या स्पर्धेत मोठे उलटफेर पाहायला मिळाले आहेत. हे पाहता कुठलाही संघ वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करु शकतो. (World Cup 2023 Points Table)

पाकिस्तानचं आव्हान कायम..

पाकिस्तानने सलग ३ सामने गमावल्यानंतर असं म्हटलं जात होतं की, पाकिस्तानचा संघ सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडेल. मात्र गेल्या सामन्यात विजय मिळवून पाकिस्तानने दमदार कमबॅक केलं आहे. (Pakistan World Cup Semi Final Scenario)

पाकिस्तानला अजुनही सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी आहे. मात्र न्यूझीलंडने श्रीलंकेला पराभूत केल्यास पाकिस्तानच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

न्यूझीलंडने या स्पर्धेतील ८ पैकी ४ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. ८ गुणांसह न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. तर पाकिस्तानचा संघ ८ गुणांसह पाचव्या स्थानी आहे.

दोन्ही संघांचे गुण सारखे असले तरीदेखील नेट रनरेट चांगला असल्याने न्यूझीलंडचा संघ आघाडीवर आहे. दोन्ही संघांचे साखळी फेरीतील १-१ सामने शिल्लक आहेत. या सामन्यावर दोन्ही संघांचं भवितव्य ठरणार आहे. (Latest sports updates)

pakistan cricket team
IND vs SA: 'आम्हाला आधीच माहीत होतं...', लाजीरवाण्या पराभवानंतर टेम्बा बावुमाच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष

पाकिस्तानला अजुनही सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी..

जर न्यूझीलंडने श्रीलंकेवर विजय मिळवला तर पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी इंग्लंडला मोठ्या फरकाने पराभूत करावं लागेल. जर न्यूझीलंडने श्रीलंकेवर मोठ्या फरकाने विजय मिळवला तर पाकिस्तानच्या अडचणीत वाढ होऊ शकते. यासह अफगाणिस्तानने पुढील २ पैकी १ सामन्यात पराभूत व्हावं अशी प्रार्थना पाकिस्तान संघाला करावी लागणार आहे.

जर न्यूझीलंड आणि पाकिस्तानने आपल्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवला. पाकिस्तानचा नेट रनरेट हा न्यूझीलंडपेक्षा कमी असेल तर ऑस्ट्रेलियाने पुढील २ सामने मोठ्या फरकाने गमवावे अशी प्रार्थ पाकिस्तानला करावी लागणार आहे. ऑस्ट्रेलियाचा नेट रन रेट कमी झाल्यास पाकिस्तानचा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करु शकतो.

pakistan cricket team
World Cup: रोहित शर्माला 'या' २८ वर्षीय गोलंदाजानं नेहमीच दिलंय टेन्शन; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा केलंय आऊट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com