IND A vs PAK A: आशिया कप फायनलमध्ये पाकिस्तानचा धावांचा डोंगर; टीम इंडियाला विजयासाठी ३५३ धावांचं आव्हान

India A vs Pakistan A Asia Cup Final: पाकिस्तानच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत तब्बल 352 धावा केल्या.
India A vs Pakistan A Asia Cup Final:
India A vs Pakistan A Asia Cup Final: Saamtv
Published On: 

India Vs Pakistan Final:  इमर्जिंग आशिया कप 2023 च्या अंतिम सामन्यात (Emerging Teams Asia Cup 2023) भारत आणि पाकिस्तानचे दोन्ही संघ (IND A vs PAK A) आमने सामने आले आहेत. कोलंबो येथे खेळवल्या जात असलेल्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 50 षटकांत तब्बल 352 धावा केल्या. भारताला हा सामना जिंकायचा असेल तर 50 षटकांत 353 धावा कराव्या लागतील.

India A vs Pakistan A Asia Cup Final:
IND W vs BAN W: स्टंपवर बॅट फेकली; अंपायरशीही भांडली.. एका निर्णयामुळे कॅप्टन हरमनप्रीत कौरचा संताप; नेमकं काय घडलं?

भारत-अ (India) आणि पाकिस्तान-अ (Pakistan) यांच्यात खेळल्या जाणार्‍या इमर्जिंग आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानी फलंदाजांनी धावांचा डोंग उभा केला. पाकिस्तानचा मधल्या फळीतील फलंदाज तय्यब ताहिरने 71 चेंडूत 108 धावांची शतकी खेळी केली. तर सलामीवीर सैम आयुब (59) आणि साहिबजादा फरहानने (65) 121 धावांची सलामी दिली होती.

भारताकडून हंगरगेकर आणि रियान पराग यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. या दमदार खेळीच्या जोरावर पाकिस्तान संघाने पूर्ण 50 षटके खेळून आठ गडी गमावून 352 धावा केल्या. आपल्या शतकी खेळीत तैयबने 71 चेंडूत 108 धावा चोपल्या. या खेळीत त्याने 4 षटकार आणि 12 चौकार मारले. तर मुबसीर खानने 35 धावांचे योगदान दिले.

India A vs Pakistan A Asia Cup Final:
Asia Cup 2023: आशिया चषक तोंडावर असताना संघाला मोठा धक्का! दिग्गज खेळाडूची ३३ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा

शतकवीर ताहीर विराटचा फॅन..

दरम्यान, आजच्या सामन्याचा हिरो ठरलेल्या ताहिरने नुकतेच पाकिस्तानकडून टी-२० पदार्पण केले आहे. ताहिरने पाकिस्तान सुपर लीग-2023 मध्येही शानदार खेळ दाखवला होता. यावेळी त्याने "तो भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा मोठा चाहता आहे आणि त्या दोघांनाही आदर्श मानत असल्याचे सांगितले होते. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.