IND W vs BAN W: स्टंपवर बॅट फेकली; अंपायरशीही भांडली.. एका निर्णयामुळे कॅप्टन हरमनप्रीत कौरचा संताप; नेमकं काय घडलं?

Harmanpreet Kaur India vs Bangladesh: कर्णधार हरमनप्रीत कौरच्या विकेटमुळे चांगलाच गोंधळ झाला. यावेळी हरमनप्रीतचाही रुद्रावतार पाहायला मिळाला.
IND W vs BAN W
IND W vs BAN W Saamtv
Published On

IND W vs BAN W Match: महिला क्रिकेटमध्ये सध्या भारतीय महिला संघ आणि बांगलादेशच्या संघात वन डे मालिकेतील अखेरचा सामना खेळवला जात आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून बांगलादेश संघाने विजयी सलामी दिली होती. तर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारताने १-१ अशी बरोबरी साधली.

या सामनादरम्यान, कर्णधार हरमनप्रीत कौरच्या विकेटमुळे चांगलाच गोंधळ झाल्याचे पाहायला मिळले. यावेळी हरमनप्रीतचाही रुद्रावतार पाहायला मिळाला. नेमकं मैदानावर काय घडलं; जाणून घ्या सविस्तर..

IND W vs BAN W
Asia Cup 2023: आशिया चषक तोंडावर असताना संघाला मोठा धक्का! दिग्गज खेळाडूची ३३ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा

सामन्यामध्ये बांगलादेशने (Bangladesh) प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ४ बाद २२५ धावा केल्या. २२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून स्मृती मानधना (Smruti Mandhana) आणि हरलीन देओल (Harleen Deol) यांनी अर्धशतकी खेळी केली. मात्र हरमनप्रीतच्या विकेटने सर्वांचे लक्ष वेधले. स्वीप मारण्याच्या प्रयत्नात असलेली हरमन फसली अन् बांगलादेशी खेळाडूंनी विकेटसाठी अपील केली.

खरं तर स्लिपमध्ये झेलचा दावा केला त्यासाठी अपील केली गेली. मात्र, अम्पायरने तिला LBW बाद घोषित करताच हरमनचा राग अनावर झाला. यावेळी रागात तिने बॅटही विकेटवर आपटली, त्यामुळे एक स्टंप पडला. इतकंच नाही तर हरमनप्रीत कौर परतताना अंपायरवर रागावतानाही दिसली.

IND W vs BAN W
Rishabh Pant Update: टीम इंडियासाठी गुड न्यूज! रिषभ पंत वर्ल्डकप खेळणार? BCCI ने दिली मोठी अपडेट

सामन्यानंतरही हरमनप्रीतने (Harmanpreet Kaur) आपली नाराजी व्यक्त केली. "मला वाटते की या सामन्यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. क्रिकेटशिवाय इथे अम्पायरिंगचा हा प्रकार पाहून मी थक्क झाले. जेव्हा आम्ही पुढच्या वेळी येऊ तेव्हा आम्ही अशा प्रकारच्या अम्पायरिंगसाठी आधीच तयार असू. मी या आधीही सांगितले होते की, इथे अत्यंत खराब अम्पायरिंग आहे. काही निर्णयांमुळे मी दुखावले आहे." असे ती यावेळी म्हणाली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com