Rishabh Pant: भारतीय संघासाठी हे वर्ष अतिशय महत्वाचे असणार आहे. येत्या काही दिवसात भारतीय संघाला आशिया चषक २०२३ स्पर्धा खेळायची आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर भारतात वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा थरार रंगणार आहे.
ही स्पर्धा भारतात होणार असल्याने भारतीय संघाला या स्पर्धेत जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. दरम्यान या स्पर्धेपूर्वी बीसीसीआयने मोठी गुडन्यूज दिली आहे.
बीसीसीआयने भारतीय संघातील ५ खेळाडूंची मेडिकल अपडेट दिली आहे. बोर्डने स्पष्ट केलं आहे की, दुखापतग्रस्त रिषभ पंत आता फिट झाला असून तो सराव करण्यासाठी मैदानात उतरला आहे.
रिषभ पंतसह प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांची देखील मेडिकल अपडेट समोर आली आहे.
बीसीसीआयने आपल्या अधिकुत ट्विटर अकाउंटवर ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे त्यांनी लिहिले की, 'त्याने पुनर्वसन प्रक्रियेत चांगली प्रगती केली आहे. आता त्याने नेट्समध्ये फलंदाजी आणि विकेटकिपिंग करायला देखील सुरुवात केली आहे. तो एका खास फिटनेस प्रोग्राममधून जात आहे. या प्रोग्रॅमद्वारे त्याच्या रनींग आणि स्ट्रेंथवर काम केलं जाणार आहे.' (Latest sports updates)
रिषभ पंत जर लवकरात लवकर फिट होऊन संघात परतला तर भारतीय संघासाठी आनंदाची बाब असेल. कारण भारतीय संघाला यावर्षी वनडे वर्ल्डकप खेळायचा आहे. जर रिषभ पंत संघात परतला तर भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाजाचा प्रश्न मिटू शकतो.
रिषभ पंत डिसेंबर २०२२ मध्ये आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यानंतर त्याच्या कारला अपघात झाल्यामुळे तो दुखापतग्रस्त झाला होता. याच कारणामुळे त्याला संघातील स्थान गमवावे लागले होते.
रिषभ पंतची कामगिरी...
रिषभ पंत हा आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या यादीत अजूनही ११ व्या स्थानी कायम आहे. त्याने ३३ कसोटी सामन्यांमध्ये २२७१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ५ शतके ११ अर्धशतके झळकावली आहेत.
तर ३० वनडे सामन्यांमध्ये त्याने ८६५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि ५ अर्धशतके झळकावली आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.