IND vs WI 2nd Test: 'रेकॉर्ड्स महत्वाचे नाही,पण..', विक्रमी शतकी खेळीनंतर विराटचे मन जिंकणारे वक्तव्य

Virat Kohli Century: या सामन्यातील पहिल्याच डावात विराटने जोरदार शतक झळकावले आहे.
virat kohli
virat kohli saam tv
Published On

Virat Kohli Statement On Century: भारतीय संघातील दिग्गज फलंदाज विराट कोहलीने अखेर परदेशात शतक झळकावले आहे. गेल्या काही वर्षांपासून तो परदेशात शतक झळकावू शकला नव्हता.

आता वेस्टइंडीज दौऱ्यावर त्याची ही प्रतीक्षा संपली आहे. पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्कच्या मैदानावर भारत आणि वेस्टइंडीज यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यातील पहिल्याच डावात विराटने जोरदार शतक झळकावले आहे. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील २९ वे शतक आहे. (Virat Kohli Century)

virat kohli
Sachin Tendulkar On Virat kohli: मास्टर- ब्लास्टरही झाला विराटच्या खेळीचा जबरा फॅन! शतक झळकावताच केली खास पोस्ट- PHOTO

यापूर्वी त्याने २०१८ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना पर्थ कसोटीत शतक झळकावले होते. आता तब्बल ५ वर्षांनंतर त्याने परदेशात जाऊन शतक पूर्ण केलं आहे. या शतकी खेळीबाबत बोलताना त्याने मन जिंकणारे वक्तव्य केले आहे. त्याचं म्हणणं आहे की, रेकॉर्डस् करणं माझ्यासाठी महत्वाचं नाही.

या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर विराट म्हणाला की, ' मला फक्त संघासाठी योगदान द्यायचं आहे. जर मी ५० धावा करतोय तर माझं शतक हुकेल. मी १२० धावा करतोय तर माझं दुहेरी शतक हूकेल. हे फक्त आकडे आहेत. हे रेकॉर्डस् माझ्यासाठी महत्वाचे नाहीत. मला संघासाठी योगदान द्यायचं आहे. हे अधिक महत्वाचं आहे.' (Latest sports updates)

virat kohli
IND vs WI 2nd Test: काय योगायोग म्हणावा हा! विराटच्या 29 व्या सेंच्युरीचं अन् क्रिकेटच्या देवाचं आहे खास कनेक्शन

तसेच तो पुढे म्हणाला की, ' माझ्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फिटनेस आहे. हे एकमेव कारण आहे ज्यामुळे मला आणखी चांगलं करण्यास प्रेरणा मिळते. देशासाठी ५०० सामने खेळणं अभिमानास्पद बाब आहे. मी घेतलेल्या मेहनतीचं हे फळ आहे. मी स्तरापर्यंत पोहचेन असा कधीच विचार केला नव्हता. ' भारतीय संघाने पहिल्या डावात ४३८ धावा केल्या आहेत. तर या धावांचा पाठलाग करताना वेस्टइंडीज संघाने आतापर्यंत १ गडी बाद ८६ धावा केल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com