Emerging Asia Cup 2023: इमर्जिंग आशिया चषक पाकिस्तानने जिंकला; टीम इंडियाचा १२८ धावांनी पराभव

India A vs Pakistan A Asia Cup Final: पाकिस्तानच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 50 षटकांत तब्बल 352 धावा केल्या होत्या....
India A vs Pakistan A Asia Cup Final
India A vs Pakistan A Asia Cup Final
Published On: 

Ind Vs Pak Mens Emerging Teams Asia Cup 2023:  पाकिस्तानने इमर्जिंग आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले आहे. कोलंबो येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा १२८ धावांनी पराभव केला. इमर्जिंग टीम्स आशिया कप 2023 च्या फायनलमध्ये पाकिस्तान अ संघाने भारत अ संघाचा १२८ धावांनी पराभव केला.

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ८ गडी गमावून ३५२ धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर देताना भारतीय संघ २२४ धावाच करू शकला. टीम इंडियाकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक ६१ धावा केल्या.. (Pakistan Won Emerging Asia Cup 2023)

India A vs Pakistan A Asia Cup Final
IND A vs PAK A: आशिया कप फायनलमध्ये पाकिस्तानचा धावांचा डोंगर; टीम इंडियाला विजयासाठी ३५३ धावांचं आव्हान

तय्यब ताहिरचा शतकी खेळी..

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान अ संघाने ५० षटकांत ८ गडी गमावून ३५२ धावा केल्या. संघासाठी तैय्यब ताहिरने शतक झळकावले. त्याने ७१ चेंडूत १०८ धावा केल्या. ताहिरच्या खेळीत १२ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. तर सलामीवीर सैम आयुब (59) आणि साहिबजादा फरहानने (65) अशी 121 धावांची ओपनिंग पार्टनरशीप केली.

भारत अ संघाकडून गोलंदाजीत रियान परागने ४ षटकात २४ धावा देत २ बळी घेतले. राजवर्धन हंगरेगकरने ६ षटकात ४८ धावा देत २ बळी घेतले. हर्षित राणाने ६ षटकात ५१ धावा देत एक विकेट घेतली.

India A vs Pakistan A Asia Cup Final
IND W vs BAN W: स्टंपवर बॅट फेकली; अंपायरशीही भांडली.. एका निर्णयामुळे कॅप्टन हरमनप्रीत कौरचा संताप; नेमकं काय घडलं?

भारतीय संघाची फलंदाजी...

प्रत्युतरात भारतीय संघाची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर साई सुदर्शन 29 धावांवर अर्शद इक्बालच्या गोलंदाजीवर मोहम्मद हारिसकडे झेल देऊन बाद झाला. तर निकिन जोसला मोहम्मद वसिम ज्युनियरने मोहम्मद हारिकरवीच 11 धावांवर झेलबाद केले. पाकिस्तान संघासाठी सुफियान मुकीम याने सर्वाधिक ३ गडी बाद केले आणि अर्शद इकबाल याने २ गडी बाद केले.

सलद दुसऱ्यंदा विजेदपद 

पाकिस्तान ए संघाने सलग दुसऱ्यांना इमर्जिंग आशिया कपमध्ये विजेतेपद पटकावलं आहे. यापूर्वी 2019 मध्ये पाकिस्तानने अंतिम फेरीत बांगलादेशचा पराभव करून विजेतेपद पटकावले. सलग दोनदा हे विजेतेपद पटकावणारा पाकिस्तान हा दुसरा संघ ठरला आहे. त्याच्या आधी श्रीलंकेने ही कामगिरी केली होती. 2017 आणि 2018 मध्ये श्रीलंकेने इमर्जिंग आशिया कपचे विजेतेपद सलग दोनदा जिंकले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.