

IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात विराट कोहली आणि नवीन उल हक यांचं जोरदार वाजलं होतं.
या दोघांचा वाद सुरु असताना गौतम गंभीरने देखील उडी घेतली होती. या तिघांमधील वाद जोरदार वाजला होता. हा वाद काही थांबायचं नाव घेत नाहीये. आता नवीन उल हकने याबाबत मोठा खुलासा केला आहे.
नवीनचा मोठा खुलासा...
लखनऊ सुपर जायंट्स संघाचा गोलंदाज नवीन उल हकने एक मोठा खुलासा केला आहे. त्याचं असं म्हणणं आहे की, या वादाची सुरुवात विराट कोहलीनेच केली होती.
नवीनने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, 'त्याने (विराटने) सामना सुरु असताना आणि सामना झाल्यानंतर असं करायला नको होतं. सामना झाल्यानंतर जेव्हा खेळाडू हात मिळवणी करत होते, त्यावेळी विराटने वाद सुरु केला.'
विराटला ठरवलं कारणीभुत..
तसेच तो पुढे म्हणाला की, 'सामना झाल्यानंतर जेव्हा दंड लादला गेला, त्यावरून स्पष्ट दिसून येत होतं की, चूक कोणाची होती.' कारण विराट कोहलीवर १०० टक्के दंड आकारला गेला होता. तर नवीन उल हकवर मॅच फीचा ५० टक्के दंड आकाराला गेला होता. (Latest sports updates)
मी कधीच स्लेज करत नाही..
नवीन उल हकने पुढे म्हटले की, 'मला फक्त एकच गोष्ट म्हणायची आहे की, मी कधीच स्लेज करत नाही. मी स्लेज तेव्हाच करतो जेव्हा मी गोलंदाजी करतो. कारण मी गोलंदाज आहे. गोलंदाजाला बोलावच लागतं. मात्र त्या दिवशी मी काहिच बोललो नव्हतो.
विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात सामन्यादरम्यान जोरदार बाचाबाची झाली होती. नवीन जेव्हा फलंदाजी करत होता त्यावेळी विराट त्याला काहीतरी बोलताना दिसून आला होता.
दोघांमध्ये इतकं वाजलं की अंपायरला हस्तक्षेप करावा लागला होता. दरम्यान सामना झाल्यानंतर तर हे प्रकरण हाताबाहेर गेल्याचे पाहायला मिळाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.