virat Kohli
virat Kohli Saam TV

Virat Kohli Insta Story : 'टीम इंडियात काहीतरी मोठं घडणार?', विराट कोहलीच्या नव्या इन्स्टा स्टोरीने चर्चांना उधाण

Virat Kohli : अनेकजण विराटच्या या पोस्टचा संबंध रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्याशी जोडत आहेत.
Published on

Virat Kohli News : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील पराभवनानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर अनेकांनी टीका केली. दरम्यान टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीची इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत आली आहे. अनेकजण विराटच्या या पोस्टचा संबंध रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्याशी जोडत आहेत.

विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर प्रसिद्ध इंग्रजी लेखक आणि वक्ते अॅलन विल्सन वॉट्स यांचा एक कोट शेअर केला आहे. परिवर्तनातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग ते स्वीकारणे, त्यासोबत पुढे जाणे आणि त्याचा आनंद घेणे, असा या कोटचा अर्थ आहे. (Latest sports updates)

विराट या पोस्टद्वारे कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला हटवण्याची मागणी बीसीसीआयकडे करत असल्याचं काही फॅन्सचं म्हणण आहे. काही काहीजण भारतीय क्रिकेटमध्ये काहीतरी मोठे घडणार असल्याचं सांगतं आहेत.

virat Kohli
Ambati Rayudu: World Cup साठी तयार राहा असं सांगितलं अन्..., निवृत्तीनंतर रायुडूचा मोठा गौप्यस्फोट
virat Kohli
Rohit Sharma Captaincy: रोहित शर्माला कर्णधार पदावरून काढून 'या' खेळाडूला कर्णधार करा, माजी खेळाडूची BCCI कडे मागणी

याआधीची स्टोरीही चर्चेत

याआधीही कोहलीने WTC फायनल मॅचनंतर एक स्टोरी शेअर केली होती. त्यातही त्याने एका प्रसिद्ध लेखकाचा एक कोट शेअर केला होता. शांत राहणे हा शक्तीचा शानदार स्त्रोत आहे, असा त्या कोटचा अर्थ होता. WTCमधील त्याच्या चुकीच्या शॉट सिलेक्शनवर टीका करणाऱ्यांन त्याने या कोटच्या माध्यमातून उत्तर दिल्याचं बोललं जात होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com