Rohit Sharma Captaincy: रोहित शर्माला कर्णधार पदावरून काढून 'या' खेळाडूला कर्णधार करा, माजी खेळाडूची BCCI कडे मागणी

IND vs WI: भारतीय कसोटी संघाचा भावी कर्णधार कोण? याबाबत दिग्गज खेळाडूने भाष्य केलं आहे.
Rohit sharma
Rohit sharmasaam tv
Published On

Team India Test Captain: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला दुसऱ्यांदा जेतेपद मिळाली होती. मात्र अंतिम सामन्यात भारतीय संघाला परभावाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

अनेकांनी तर त्याला कर्णधार पदावरून काढून टाकण्याची मागणी केली आहे. आता माजी निवडकर्त्यांनी भारतीय कसोटी संघाचा भावी कर्णधार कोण? याबाबत भाष्य केलं आहे.

Rohit sharma
Asia Cup: आशिया चषक स्पर्धेपू्र्वी 'या' क्रिकेटपटूने केली निवृत्तीची घोषणा; संघासाठी खेळले आहेत ७ वर्ल्ड कप

भारतीय संघाला दोन वेळेस वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याची संधी मिळाली आहे. मात्र दोन्ही वेळेस भारतीय संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले आहे. २०२१ मध्ये जेव्हा भारतीय संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. त्यावेळी विराट कोहली हा भारतीय संघाचा कर्णधार होता.

तर २०२३ मध्ये रोहित शर्मा हा भारतीय संघाचा कर्णधार आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता १२ जुलैपासून भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचे पुढील चक्र सुरु होणार आहे.

या स्पर्धेचा अंतिम सामना २०२५ मध्ये पार पडणार आहे. तोपर्यंत रोहित शर्माचं वय ३८ होईल. त्यामुळे तो कसोटी क्रिकेट खेळणं सुरु ठेवणार का? असे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. (Latest sports updates)

Rohit sharma
Asia Cup 2023: BCCI ने विरोध करूनही Asia Cup चे आयोजन पाकिस्तानात, पण...

याबाबत बोलताना माजी भारतीय फलंदाज आणि माजी भारतीय निवडकर्ते, देवांग गांधी यांनी म्हटले की, 'रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करणं सुरु ठेवावं का? याबाबत निवडकर्त्यांनी चर्चा करावी. रोहित शर्मा हा दोन वर्ष भारतीय संघाचा भाग राहील की नाही, हे मला माहित नाही. त्यांनी रोहित सोबत बोलावं आणि मार्ग काढावा.'

या खेळाडूला मिळायला हवी कर्णधारपदाची जबाबदारी..

तसेच रोहित शर्मा नंतर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार कोण ? याबाबत बोलताना देवांग गांधी म्हणाले की, 'खरं सांगायचं झालं तर ही आतली गोष्ट असू शकते. योगायोगाने जर रोहित संघाचे नेतृत्व करणार नसेल. तर संघाचा पुढील कर्णधार कोण? तो रहाणे किंवा अश्विन असू शकतो.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com