Retirement: यावर्षी आशिया चषक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र बीसीसीआयने पाकिस्तानमध्ये जाऊन खेळण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
या स्पर्धेचे आयोजन कुठल्या देशात केले जाणार याबाबत कुठलीही माहिती समोर आली नाही. दरम्यान ही स्पर्धा सुरु होण्यापुर्वीच पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करण्याचा निर्णय घेतला आहे.
या क्रिकेटपटूने केली निवृत्तीची घोषणा..
पाकिस्तान महिला संघातील खेळाडू नाहीदा खानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करण्याचा निर्णय घेतला आहे. तिने १४ वर्षांच्या कारकिर्दीला अखेर पुर्णविराम दिला आहे.
तिने ७ फेब्रुवारी २००९ मध्ये श्रीलंका संघाविरूद्ध झालेल्या सामन्यातुन आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरूवात केली होती. ती पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व करणारी बलूचिस्तानची एकमात्र महिला क्रिकेटपटू आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.
पाकिस्तान संघासाठी ७ वर्ल्ड कप खेळणारी महिला क्रिकेटपटू..
नाहीदा खानने ३ वेळा वनडे आणि ४ वेळा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तिने २०१३,२०१७ आणि २०२२ वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
तर २०१२,२०१४, २०१६ आणि २०१८ टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तिने नुकताच पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महिला क्रिकेट स्पर्धेत ब्लास्टर्स संघाचा सहाय्यक प्रशिक्षक म्हणुन पदभार स्विकारला आहे. (Latest sports updates)
अशी राहीली कारकिर्द..
नाहीदा खानने १२० सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तर फलंदाजी करताना २०१४ धावा केल्या आहेत. यादरम्यान तिला एकही गडी बाद करता आला नाही. २०१८ मध्ये जेव्हा पाकिस्तान आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने सामने आले होते, त्यावेळी नाहीदाने वनडे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम झेल टिपण्याचा विक्रम केला होता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.