Ambati Rayudu: World Cup साठी तयार राहा असं सांगितलं अन्..., निवृत्तीनंतर रायुडूचा मोठा गौप्यस्फोट

Ambati Rayudu On 2019 WC: आता ४ वर्षानंतर त्याने या प्रकरणावर भाष्य केलं आहे.
ambati rayudu
ambati rayudusaam tv
Published On

Team India : आयपीएल २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अंबाती रायुडूने निवृत्तीची घोषणा केली होती. त्याने चेन्नईला चॅम्पियन बनवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. मध्यक्रमात तुफान फटकेबाजी करणाऱ्या या फलंदाजाने ४ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम ठोकला होता. २०१९ वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्याची निवड केली गेली नव्हती.

प्रबळ दावेदार असतानाही त्याच्या ऐवजी युवा खेळाडूला संघात स्थान दिलं गेलं होतं. या रागात त्याने थेट निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान आता ४ वर्षानंतर त्याने या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

ambati rayudu
Suryakumar Yadav: मिस्टर ३६० ला बॉलिंग करताना पाहिलंय का? कारकिर्दीतील सर्वोत्तम चेंडू टाकत घेतला भन्नाट कॅच; VIDEO पाहायलाच हवा

अंबाती रायुडूने टीव्ही ९ तेलगूला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, '२०१९ वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जर निवडकर्त्यांनी अजिंक्य रहाणे सारख्या अनुभवी आणि वरिष्ठ खेळाडूला संधी दिली असती तर मला काही वाटलं नसतं. कारण रिप्लेस केलेल्या खेळाडूचा संघाला फायदा झाला पाहिजे. त्यामुळेच मला राग आला. हे विजय शंकरसाठी मुळीच नव्हते.' रायुडूच्या या वक्तव्यावरून हे स्पष्ट आहे की, रायुडूचा राग हा विजय शंकरवर नव्हता. तर अनुभवी खेळाडूच्या जागी युवा खेळाडूला संधी का दिली यावर होता. (Latest sports updates)

ambati rayudu
R Ashwin DRS In TNPL: अश्विन अण्णा रॉक्स! DRS निर्णयावरही घेतला पुन्हा DRS, सगळेच चक्रावले; पुढे काय झालं पाहा VIDEO

वर्ल्ड कप २०१९ स्पर्धा सुरु होण्यापूर्वी अंबाती रायुडू जोरदार फॉर्ममध्ये होता. त्याने संघासाठी दमदार कामगिरी केली होती. चौथ्या क्रमाकांवर खेळताना त्याने धावांचा पाऊस पाडला होता. मात्र वर्ल्ड कप सुरु होण्याच्या काही सामन्यांपूर्वी त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती.

त्यामुळे निवडकर्त्यांनी अंबाती रायुडूला दुर्लक्ष करत त्याच्या ऐवजी विजय शंकरला संधी दिली गेली होती. त्यावेळी विजय शंकरला थ्री डी खेळाडू म्हटले गेले होते. जो फलंदाजी, गोलंदाजी आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण करू शकतो.

विजय शंकरची निवड होताच, अंबाती रायुडूने एक ट्वीट केले होते. त्याने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले होते की, 'आता मी वर्ल्ड कप पाहण्यासाठी थ्री डी गॉगल मागवले आहेत.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com