MI vs KKR Highlights : पॉवर प्लेमध्ये मुंबई इंडियन्सची 'पॉवर फुस्स'!, रोहित शर्मा, रेकल्टन, नमनसह सूर्यकुमार यादव बाद

mumbai indians lose three wickets in powerplay against kkr : मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात आयपीएल सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. पॉवर प्लेमध्येच मुंबई इंडियन्सने चार महत्वाच्या विकेट्स गमावल्या आहेत.
मुंबई इंडियन्सला जोरदार हादरा, पॉवर प्लेमध्येच ४ विकेट्स गमावल्या
Mumbai Indians vs Kolkata knight Riders live score updateX/ipl
Published On

KKR vs MI live Score update : आयपीएल २०२६ च्या ६५ व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे यानं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तो अगदी पथ्यावर पडला. मुंबई इंडियन्सचे ४ आघाडीचे फलंदाज पॉवर प्ले संपण्याआधीच तंबूत परतले आहेत. रेकल्टन, नमन आणि रोहित शर्मासह सूर्यकुमार यादव हे बाद झाले.

कोलकाता नाइट रायडर्स संघ आयपीएल गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे. तर मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे. मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. तर कोलकाता नाइट रायडर्सला अजूनही प्ले ऑफच्या शर्यतीत संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोलकातासाठी हा सामना अत्यंत महत्वाचा आहे. आयपीएलच्या या मोसमातील हा ६५ वा सामना आहे. अजिंक्य रहाणे यानं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत मुंबई इंडियन्सला फलंदाजीसाठी निमंत्रित केलं. कर्णधार हार्दिक पंड्या या सामन्यात खेळणार आहे. ही लढत मुंबई इंडियन्ससाठी अस्तित्वाची आहे. तर केकेआरसाठी करो या मरो अशी स्थिती आहे.

मुंबई इंडियन्सची सुरुवात अत्यंत संथ झाली होती. तिसऱ्या षटकात मुंबई इंडियन्सच्या अवघ्या १७ धावा झाल्या होत्या. त्याचवेळी कॅमरून ग्रीनने रेकल्टनला झेलबाद केले. मनीष पांडे याने त्याचा सुंदर झेल टिपला. त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नमन धीर हा रघुवंशीद्वारे झेलबाद झाला. १७ धावांवर मुंबईला सलग दोन हादरे बसले. रोहित शर्माने षटकार खेचून आपले इरादे स्पष्ट केले. पण १५ धावांवर खेळत असताना मोठा फटका मारण्याच्या नादात तो देखील झेलबाद झाला. सूर्यकुमार यादवने सुरुवात जबरदस्त केली. ६ चेंडूत त्याने १५ धावा कुटल्या. पण तो देखील त्रिफळाचीत झाला. त्याला सौरभ दुबे याने बाद केले.

मुंबई इंडियन्सला जोरदार हादरा, पॉवर प्लेमध्येच ४ विकेट्स गमावल्या
WTC Point Table : डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये मोठा उलटफेर; बांगलादेश-पाकिस्तान कसोटीमुळं टीम इंडियाला जोरदार झटका

मुंबई इंडियन्सची प्लेइंग ११

रयान रेकल्टन, रोहित शर्मा, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, विल जॅक, कॉर्बिन बॉश, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह, रघु शर्मा.

कोलकाता नाइट रायडर्सची प्लेइंग ११

अजिंक्य रहाणे, अंगकृष रघुवंशी, कॅमरून ग्रीन, रोवमॅन पॉवेल, मनीष पांडे, रिंकू सिंह, सुनील नरेन, अनुकूल रॉय, कार्तिक त्यागी, वरूण चक्रवर्ती, सौरभ दुबे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com