GT vs MI, IPL 2024: रोहितला तर नाही जमलं..हार्दिकच्या नेतृत्वात मुंबई १३ वर्षांची ती परंपरा मोडणार का?

Mumbai Indians Opening Match Record: मुंबई इंडियन्स हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. या संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना ५ वेळेस जेतेपदाला गवसणी घातली आहे.
mumbai indians never won their first match in ipl since 2013 can hardik pandya change history
mumbai indians never won their first match in ipl since 2013 can hardik pandya change history twitter
Published On

Mumbai Indians Opening Match Record News:

मुंबई इंडियन्स हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. या संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना ५ वेळेस जेतेपदाला गवसणी घातली आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचा पहिला सामना गुजरात टायटन्स संघाविरुद्ध होणार आहे.

हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. यावेळी हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी हार्दिक पंड्यासमोर मोठं आव्हान असणार आहे.

मुंबई इंडियन्सने २०१३ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना पहिल्यांदा जेतेपदावर नाव करोलं होतं. गेल्या हंगामात मुंबईने ५ वेळेस जेतेपदाचा मान मिळवला आहे. मात्र यादरम्यान मुंबईला ओपनिंगचा सामना जिंकता आलेला नाही. सर्वात यशस्वी संघाला २०१३ पासून स्पर्धेतील पहिला सामना जिंकता आलेला नाही. २०१३ पासून मुंबईने ११ ओपनिंग सामने खेळले आहेत. हे सर्व सामने मुंबईने गमावले आहेत. आता हार्दिक पंड्या ही साखळी मोडणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

mumbai indians never won their first match in ipl since 2013 can hardik pandya change history
GT vs MI, IPL 2024: मुंबई की गुजरात, कोण मारणार अहमदाबादचं मैदान? वाचा वेदर अन् पिच रिपोर्ट

मुंबई इंडियन्सचा आयपीएल २०२४ स्पर्धेतील पहिला सामना गुजरात टायटन्सविरद्ध होणार आहे. गेल्यावर्षी गुजरात टायटन्स संघाचं नेतृत्व करणारा हार्दिक पंड्या यावेळी मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. तर युवा फलंदाज शुभमन गिल गुजरात टायटन्स संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. मुंबईला पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून ३ वेळेस पराभवाचा सामना करावा लागला आहे.तर केकेआर,दिल्ली कॅपिटल्स. आणि आरपीएसने प्रत्येकी २-२ वेळेस पराभूत केलं आहे. (Cricket news in marathi)

mumbai indians never won their first match in ipl since 2013 can hardik pandya change history
KKR VS SRH Last Over: २ चेंडूत ५ धावांची गरज अन् एका कॅचमुळे फिरली मॅच! शेवटच्या षटकात नेमकं काय घडलं?

आयपीएल २०१३ पासून पहिल्या सामन्यात असा राहिलाय मुंबईचा रेकॉर्ड..

आयपीएल २०१- RCB कडून पराभव

आयपीएल २०१४- KKR कडून पराभव

आयपीएल २०१५- KKR कडून पराभव

आयपीएल २०१६- RPS कडून पराभव

आयपीएल २०१७- RPS कडून पराभव

आयपीएल २०१८- CSK कडून पराभव

आयपीएल २०१९- DC कडून पराभव

आयपीएल २०२०- CSK कडून पराभव

आयपीएल २०२१- RCB कडून पराभव

आयपीएल २०२२- DC कडून पराभव

आयपीएल २०२३- RCB कडून पराभव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com