Mumbai indians team strenght and weakness can mi become champion again in hardik pandya captaincy
Mumbai indians team strenght and weakness can mi become champion again in hardik pandya captaincy yandex

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सची जमेची बाजू आणि उणिवा काय? हार्दिक पंड्यासमोर काय आहेत आव्हाने?

Mumbai Indians Strenghts And Weakness: मुंबई इंडियन्स हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने आतापर्यंत ५ वेळेस जेतेपदावर नाव कोरलं आहे.

Mumbai Indians Team Details:

मुंबई इंडियन्स हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने आतापर्यंत ५ वेळेस जेतेपदावर नाव कोरलं आहे. मात्र गेल्या ३ हंगामात मुंबईला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. २०२० मध्ये झालेल्या हंगामात मुंबईने आयपीएल जिंकली होती. त्यानंतर २०२३ मध्ये झालेल्या हंगामात मुंबईने प्लेऑफमध्ये प्रवेश केला. मात्र एलिमिनेटरच्या सामन्यात गुजरातकडून पराभवाचा सामना करावा लागला. आगामी हंगामासाठी मुंबईने आपल्या संघात मोठा बदल केला आहे.

आयपीएल २०२२ स्पर्धेत गुजरातला चॅम्पियन बनवणाऱ्या आणि २०२३ मध्ये फायनलपर्यंत पोहचवणाऱ्या हार्दिक पंड्याला मुंबईने आपल्या ताफ्यात स्थान दिलं. त्याला मुंबईने १५ कोटींची किंमत मोजत आपल्या संघात स्थान दिलं. त्यानंतर रोहितला कर्णधारपदावरुन काढून ही जबाबदारी हार्दिककडे सोपवली. मात्र हार्दिककडे मुंबईला चॅम्पियन बनवण्याची क्षमता आहे का? जाणून घ्या.

Mumbai indians team strenght and weakness can mi become champion again in hardik pandya captaincy
IPL 2024 : मोहम्मद शमीच्या जागी गुजरात टायटन्सने आणला दुसरा गोलंदाज, कोण आहे गुजरातचा नवा भिडू?

मुंबईची मजबूत फलंदाजी..

या स्पर्धेत सर्वात मजबूत फलंदाजी क्रम हा मुंबई इंडियन्सचा आहे. या संघाकडून रोहित शर्मा आणि इशान किशनची जोडी डावाची सुरुवात करताना दिसेल. रोहित सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. तर इशान किशनकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. रोहित,इशानसह तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड,डेवाल्ड ब्रेविस आणि हार्दिक पंड्यासारखे आक्रमक फलंदाज आहेत. गेल्या हंगामात मुंबईने २०० हून अधिक धावांचा पाठलाग केला होता. (Cricket news in marathi)

Mumbai indians team strenght and weakness can mi become champion again in hardik pandya captaincy
Mumbai Indians: मुंबईची ताकद वाढली! रिप्लेसमेंट म्हणून रबाडाची पलटणमध्ये एन्ट्री

गोलंदाजी..

गेल्या हंगामात बाहेर राहिलेला जसप्रीत बुमराह या हंगामात कमबॅक करताना दिसून येणार आहे. त्यामुळे मुंबईची ताकद आणखी वाढणार आहे. तर फिरकी गोलंदाज म्हणून अनुभवी गोलंदाज पियुष चावला देखील आहे. यासह रोमारियो शेफर्ड, गेराल्ड कोएत्जी, क्वेना मफाकासारखे गोलंदाज संघात असल्याने मुंबईची ताकद आणखी वाढली आहे.

या हंगामासाठी असा आहे मुंबईचा संघ:

हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, टिम डेविड, तिलक वर्मा, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, नेहाल वढेरा, शम्स मुलानी, विष्णु विनोद, पियुष चावला, रोमारियो शेफर्ड, गेराल्ड कोएत्जी, क्वेना मफाका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, अंशुल कंबोज, नमन धीर, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com