hardik pandya and rohit sharma hugged each other reaction of rohit went viral watch mumbai indians video
hardik pandya and rohit sharma hugged each other reaction of rohit went viral watch mumbai indians video twitter

Rohit Sharma- Hardik Pandya: अखेर गळाभेट झाली! पण, रोहितच्या रिॲक्शनने वेधलं लक्ष; पाहा Video

Mumbai Indians Video: मुंबई इंडियन्सचा पहिला सामना २४ मार्च रोजी गुजरात टायटन्स संघाविरुद्ध होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे

Hardik Pandya- Rohit Sharma Video:

मुंबई इंडियन्सचा पहिला सामना २४ मार्च रोजी गुजरात टायटन्स संघाविरुद्ध होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. हा दोन्ही संघांचा या हंगामातील पहिलाच सामना असणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघातील खेळाडू घाम गाळताना दिसून येत आहेत. दरम्यान रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रोहित शर्मा- हार्दिक पंड्याची भेट...

आगामी आयपीएल हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी संघातील खेळाडू एकत्र आले असून सर्व खेळाडूंनी सराव करायला सुरुवात केली आहे. दरम्यान व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये नवा कर्णधार हार्दिक पंड्या माजी कर्णधार रोहित शर्माला मिठी मारताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

hardik pandya and rohit sharma hugged each other reaction of rohit went viral watch mumbai indians video
Mumbai Indians: मुंबईची ताकद वाढली! रिप्लेसमेंट म्हणून रबाडाची पलटणमध्ये एन्ट्री

रोहितच्या जागी हार्दिककडे संघाची धुरा..

गेल्या १० वर्षांपासून रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करत होता. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्सने ५ वेळेस जेतेपदावर नाव कोरलं आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेच्या लिलावापू्र्वी मुंबई इंडियन्सने आपल्या संघात मोठा बदल केला. गेल्या वर्षी गुजरात टायटन्स संघाचं नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पंड्याला मुंबईने १५ कोटी मोजत आपल्या संघात घेतलं. त्यानंतर रोहितला कर्णधारपदावरुन काढून ही जबाबदारी हार्दिककडे सोपवली. या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. (Cricket news in marathi)

असं म्हटलं जात होतं की, या निर्णयामुळे रोहित शर्मा नाराज आहे. त्यामुळेच भेटीनंतर रोहित खुश दिसून आला नाही. २०१५ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना हार्दिक पंड्याने पदार्पण केलं होतं. आता रोहित शर्मा त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसून येणार आहे.

hardik pandya and rohit sharma hugged each other reaction of rohit went viral watch mumbai indians video
IPL Records: गेलचं विक्रमी शतक ते विराटचा कहर; IPL स्पर्धेतील हे रेकॉर्ड्स मोडणं कठीण नव्हे तर अशक्यच

आगामी हंगामासाठी असा आहे मुंबई इंडियन्सचा संघ:

हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, टिम डेविड, तिलक वर्मा, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, नेहाल वढेरा, शम्स मुलानी, विष्णु विनोद, पियुष चावला, रोमारियो शेफर्ड, गेराल्ड कोएत्जी, क्वेना मफाका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, अंशुल कंबोज, नमन धीर, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com