MI vs DC : अक्षर-वॉर्नरकडून मुंबईची धुलाई, अर्धशतकी खेळ करत मुंबईपुढे ठेवलं विजयासाठी मोठं लक्ष्य

IPL 2023 : या सामन्यात मुंबईने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 19.4 षटकात सर्वबाद 172 धावा केल्या.
MI vs DC Akshar-Warner's washout of Mumbai
MI vs DC Akshar-Warner's washout of Mumbaisaam tv
Published On: 

Delhi Capitals vs Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये (Indian Premier League) आज दिल्ली कॅपिटल्सचा आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने आले आहेत. या सामन्यात मुंबईने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 19.4 षटात सर्वबाद 172 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नर आणि अक्षर पटेलीच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर दिल्लीने मुंबईसमोर विजयासाठी 173 धावांचं आव्हान ठेवलं आहे.

प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने आक्रमक सुरुवात करत वेगाने धावा केल्या. मात्र पृथ्वी शॉ अवघ्या 15 दावा करून बाद झाला. त्यानंतर थोडा वेळ मनिष पांडेने वॉर्नरची साथ दिली. त्याने 18 चेंडूत 26 धावांची खेळी केली. त्यानतंर दिल्लीला एकामागोमाग तीन झटके लागले आणि यश धूल, रोवमन पॉवेल आणि ललीत यादव झटपट माघारी परतले.

MI vs DC Akshar-Warner's washout of Mumbai
BCCI Announces Schedule: आयपीएल स्पर्धा सुरु असतानाच BCCI ने केली मोठ्या स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा

परंतु त्यानंतर आलेल्या अक्षर पटेले दिल्लीच्या स्कोरबोर्डला गती दिली. अक्षप पटेलने आक्रमक खेळी करत 23 चेंडूत अर्थशतक झळकावले. 25 चेंडूत 54 धावांची खेळी करून तो बाद झाला. त्यानंतर वॉर्नर देखील 51 धावांच्या स्कोअरवर बाद झाला. परंतु वॉर्नरने एका बाजूने केलेली संयमी खेळी आणि शेवटच्या फळीत आलेल्या अक्षर पटेलच्य रौद्र अवतारामुळे दिल्लीने निर्धारित 20 षटकात मुंबईसमोर विजयासाठी 173 धावांचे लक्ष्य ठेवले. (Latest Sports News)

मुंबईकडून पियुष चावला आणि जेसन बेहरेनडॉर्फ यांनी 3-3 विकेट घेतल्या, याशिवाय रिले मेरेडिथने दोन आणि हृतिक शोकीन एक विकेट घेतली.

लीगमधील सर्वात यशस्वी संघ मोसमातील पहिला विजय मिळवण्यासाठी उत्सुक आहे, तर सलग तीन सामने गमावलेला दिल्ली कॅपिटल्स संघही विजय मिळवण्यासाठी आतुर आहे. या लीगमधील दोन्ही संघांचे रेकॉर्ड एकमेकांच्या विपरित असले तरी यंदाचा हंगाम दोन्ही संघांसाठी सारखाच आहे.

दिल्ली कॅपिटल्सने या मोसमात आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत आणि तीनही त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सलाही पहिल्या दोन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहेत. या सामन्यात दोन्हीपैकी एका संघाचं विजयाचं खातं उघडणार आहे हे नक्की. (IPL 2023)

MI vs DC Akshar-Warner's washout of Mumbai
Arjun Tendulkar Debut : आज अर्जुन तेंडुलकरचं होणार पदार्पण? हिटमॅन देणार संधी,अशी असेल मुंबईची प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन:

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, अर्शद खान, जेसन बेहरेनडॉर्फ, रिले मेरेडिथ, पियुष चावला.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन:

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, मनीष पांडे, यश धुल, रोव्हमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, अॅनरिक नॉर्टजे, मुस्तफिजुर रहमान.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com