Arjun Tendulkar Debut : आज अर्जुन तेंडुलकरचं होणार पदार्पण? हिटमॅन देणार संधी,अशी असेल मुंबईची प्लेइंग 11

IPL 2023 DC vs MI : आज होणारा सामना हा दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे
Arjun Tendulkar
Arjun TendulkarSaam Tv
Published On: 

DC VS MI Playing 11: आज दिल्लीच्या अरुण जेठली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये आज रोमांचक सामना पार पडणार आहे. मुंबई इंडियन्स संघाने सलग २ सामने गमावले आहेत.

तर दिल्ली कॅपिटल्स संघाने पराभवाची हॅट्ट्रिक केली आहे. त्यामुळे आज होणारा सामना हा दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.या सामन्यात मुंबई इंडियन्स संघात कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Arjun Tendulkar
Umpire Salary in IPL: अजिंक्य रहाणे अन् रिंकू सिंग पेक्षाही जास्त आहे अंपायरची सॅलरी! एका हंगामाचा पॅकेज ऐकून बसेल धक्का

मुंबई इंडियन्स संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्याच्या ऐवजी वेगवान गोलंदाजी आक्रमणाची धुरा जोफ्रा आर्चरच्या हाती होती. मात्र तो देखील दुखापतीमुळे बाहेर बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यामुळे त्याच्या ऐवजी डाव्या हाताचा अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडुलकरला पदार्पण करण्याची संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे. (Arjun Tendulkar Debut)

गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला चेन्नई संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यासाठी अर्जुन तेंडुलकरची इम्पॅक्ट प्लेअर म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र रोहितने ऐनवेळी कुमार कार्तिकेयला संधी दिली होती. त्यामुळे अर्जुन तेंडुलकरची पदार्पण करण्याची संधी हुकली होती. (Latest sports updates)

Arjun Tendulkar
Rinku Singh IPL 2023: उमेश यादवच्या 4 शब्दांचा इम्पॅक्ट अन् रिंकूने ठोकले खणखणीत 5 षटकार! काय म्हणाला उमेश यादव? वाचा

२ वर्षांपासून पाहतोय पदार्पणाची वाट..

अर्जुन तेंडुलकर बद्दल सांगायचं झालं तर गेल्या २ वर्षांपासून तो मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करतोय. मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाहीये. त्यामुळे नेटकरी अर्जुन तेंडुलकरच्या पदार्पणाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

आयपीएल २०२३ स्पर्धेतील पहिल्या सामन्यात अर्जुन तेंडुलकर मनगटाच्या दुखण्याने त्रस्त होता. तर दुसऱ्या सामन्यात त्याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संधी दिली गेली होती. आता मुंबई इंडियन्स संघाची निराशाजनक कामगिरी पाहता, आज होणाऱ्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

अशी असेल मुंबई इंडियन्स संघाची प्लेइंग 11:

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन ( यष्टिरक्षक), कॅमेरन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, जोफ्रा आर्चर, अर्शद खान, हृतिक शोकिन, पियूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com