

BCCI Announces Schedule Of Domestic Tournaments: सध्या भारतात आयपीएल २०२३ स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत आतापर्यंत १५ सामने खेळले गेले आहेत. ही स्पर्धा सुरु असतानाच बीसीसीआयने २०२३-२४ मध्ये होणाऱ्या देशांतगर्त क्रिकेट स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
आगामी २०२३-२४ हंगामातील देशांतर्गत क्रिकेट सामन्यांची सुरवात ही दुलीप ट्रॉफी स्पर्धेने होणार आहे. तर २०२४ च्या सुरुवातीला रणजी ट्रॉफी स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.
दुलीप ट्रॉफी स्पर्धेची सुरुवात २८ जून २०२३ पासून होणार आहे. तर रणजी ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन ५ जानेवारी २०२४ रोजी केले जाणार आहे. त्यानंतर देवधर ट्रॉफी लिस्ट ए स्पर्धा( २४ जुलै ते ३ ऑगस्ट) इराणी कप (१ ते ५ ऑक्टोबर), सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफी (१६ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर), विजय हजारे ट्रॉफी (२३ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर)
रणजी ट्रॉफी स्पर्धेला ५ जानेवारीपासून सुरुवात..
रणजी ट्रॉफी ही २०२३-२४ हंगामातील शेवटची स्पर्धा असेल. या स्पर्धेतील एलिट श्रेणीतील साखळी फेरीतील सामन्यांना ५ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. हे सामने १९ फेब्रुवारीपर्यंत खेळवले जातील. तर तर स्पर्धेतील नॉकआऊट सामान्यांचे आयोजन हे २३ फेब्रुवारी ते १४ मार्च दरम्यान केले जाणार आहे. ही स्पर्धा एकूण ७० दिवस खेळवली जाणार आहे. (Latest sports updates)
तर एलिट श्रेणीत ४ ग्रुपमध्ये प्रत्येकी ८-८ संघ असणार आहेत. या प्रत्येकी ग्रुपमधून २ संघ हे क्वार्टर फायनल राऊंडसाठी पात्र ठरणार आहेत. प्लेट ग्रुपच्या अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या संघांना आगामी हंगामात एलिट श्रेणीत प्रवेश करण्याची संधी मिळणार आहे. एलिट श्रेणीत सर्वात शेवटी असणाऱ्या २ संघांचा प्लेट श्रेणीत समावेश केला जाईल.
महिला खेळाडूंचे सामने केव्हा खेळवले जातील?
ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात महिलांच्या टी-२० चॅम्पियनशिप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यानंतर २४ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान आंतर-प्रादेशिक टी-२० ट्रॉफी खेळवली जाईल. या स्पर्धेचे आयोजन ४ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान केले जाणार आहे. वरिष्ठ महिला टी-२० ट्रॉफी आणि वनडे ट्रॉफीमध्ये पाच गट असतील.
यामध्ये दोन गटात प्रत्येकी आठ संघ असतील तर उर्वरित तीन गटात प्रत्येकी सात संघ असतील. प्रत्येक गटातील शीर्ष २ संघांना नॉकआउट राउंडमध्ये प्रवेश मिळणार आहे. साखळी फेरीतील सामने झाल्यानंतर १० पैकी ६ संघ हे क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरणार आहेत.
तर उर्वरित ४ संघाना अंतिम ८ मध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी प्री क्वार्टर फायनलचे सामने खेळावे लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.