MI VS CSK : मुंबईचा राजा इज बॅक...! सूर्या दादासोबत रोहित शर्माची ५०-५०, वानखेडेवर चेन्नईला पाजलं पराभवाचं पाणी

MI VS CSK IPL 2025 : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यामध्ये मुंबईचा शानदार विजय झाला आहे. या विजयामुळे मुंबईचा संघ पॉईंट्स टेबलवर वरच्या क्रमांकावर गेला आहे.
MI VS CSK IPL 2025
MI VS CSK IPL 2025X
Published On

MI VS CSK Match Updates : वानखेडे स्टेडियमवर आज आयपीएलमधील एल क्लासिको म्हणजे मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना खेळला गेला. हार्दिक पंड्याने टॉस जिंकला आणि मुंबईने प्रथम गोलंदाजी केली. चेन्नईच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १७६ धावा केल्या. १७७ धावांचे आव्हान मुंबईने सहज पेलावले. वानखेडेवरील विजयानंतर पॉईंट्स टेबलवर मुंबईचा संघ सहाव्या क्रमांकावर गेला आहे.

MI VS CSK IPL 2025
Ayush Mhatre : छोटा पॅकेट बडा धमाका! वसईच्या आयुष म्हात्रेचा वानखेडेत दरारा, वादळी खेळीवर धोनीपण भाळला

शेख रशीद आणि रचिन रवींद्र चेन्नईकडून सलामीसाठी आले. रचिन ५ धावा करुन माघारी परतला. शेख रशीदच्या साथीने आयुष म्हात्रेने खेळ पुढे नेला. २१३ च्या स्ट्राईक रेटने आयुषने झटपट ३२ धावा केल्या. मधल्या ओव्हर्समध्ये चेन्नईची सामन्यामधली पकड पूर्णपणे सुटल्याचे पाहायला मिळाले. एमएस धोनीने ४ धावा केल्या. शिवम दुबे आणि रविंद्र जडेजा या दोघांनी अर्धशतकीय खेळी केली. जसप्रीत बुमराहने २ विकेट्स घेतल्या.

MI VS CSK IPL 2025
Vaibhav Suryavanshi : पदार्पणात खळबळ माजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीला मटण आणि पिझ्झा खाण्यास बंदी, कारण काय?

दुसऱ्या बाजूला मुंबईची सुरुवात खूप चांगली झाली. रायन रिकल्टन २४ धावा करुन तंबूत परतला. त्यानंतर रोहित शर्माने सूर्यकुमार यादवच्या साथीने मोर्चा सांभाळला. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव शेवटपर्यंत टिकून राहिले. हिटमॅन रोहित शर्मा पुन्हा फॉर्मात आल्याचे पाहायला मिळाले. त्याने ४५ चेंडूंमध्ये नाबाद ७६ धावा केल्या. त्याला सूर्याची चांगली साथ लाभली. सूर्याने ३० चेंडूंमध्ये नाबाद ६८ धावा केल्या. पथीरानाच्या ओव्हरमध्ये पटापट तीन षटकार मारत सूर्यकुमार यादवने मुंबईचा विजय पक्का केला.

MI VS CSK IPL 2025
महिलांशी अनैतिक संबंध, हुंड्यासाठी छळ, घरगुती हिंसा... IPL मध्ये १७४ विकेट्स घेतलेल्या खेळाडूवर पत्नीचे गंभीर आरोप

मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११ -

हार्दिक पंड्या (कर्णधार), रायन रिकल्टन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ड, जसप्रीत बुमराह, अश्वनी कुमार

चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग ११ -

एमएस धोनी (कर्णधार), शेख रशीद, रचिन रवींद्र, आयुष म्हात्रे, विजय शंकर, जेमी ओवर्टन, रवींद्र जडेजा, खलील अहमद, नूर अहमद, अंशुल कम्बोज, मथीश पाथिराना

MI VS CSK IPL 2025
MI विरुद्धच्या सामन्यात CSK ने मुंबईचा खेळाडू मैदानात उतरवला, जाणून घ्या कोण आहे आयुष म्हात्रे?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com