Vaibhav Suryavanshi : पदार्पणात खळबळ माजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीला मटण आणि पिझ्झा खाण्यास बंदी, कारण काय?

Vaibhav Suryavanshi RR : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने काल राजस्थान रॉयल्सकडून खेळत आयपीएलमध्ये पदार्पण केले. पहिल्याच सामन्यात त्याने शानदार खेळ करत सर्वांना खुश केले. सोशल मीडियावर वैभव चर्चेचा विषय बनला आहे.
Vaibhav Suryavanshi RR
Vaibhav Suryavanshi RRX
Published On

राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या सामन्याच्या माध्यमातून १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये पदार्पण केले. सर्वात कमी वयात आयपीएलमध्ये पदार्पण करण्याचा विक्रम वैभवने कालच्या सामन्यामध्ये केला. सलामीसाठी मैदानात उतरल्यावर त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. पदार्पणात दमदार खेळी करत वैभवने सर्वांना प्रभावित केले.

यशस्वी जयस्वालसह वैभव सूर्यवंशी राजस्थानकडून सलामीसाठी मैदानात उतरला. वैभवने इम्पॅक्ट प्लेयर म्हणून कालचा सामना खेळला. शार्दुल ठाकूरच्या ओव्हरमध्ये आयपीएलमधला पहिला चेंडू खेळताना त्याने मोठा षटकार मारला. २० चेंडूंमध्ये ३४ धावा करुन तो माघारी परतला. त्याचा स्ट्राईक रेट १७० होता. त्याने काल दोन चौकार आणि तीन षटकार मारत राजस्थानला चांगली सुरुवात करवून दिली.

Vaibhav Suryavanshi RR
PBKS VS RCB : रजत पाटीदारचा 'सेफ' गेम! दुपारच्या सामन्यात पंजाबची कोंडी करण्याची करण्यासाठी खेळला डाव

आयपीएलपर्यंत पोहोचण्याचा वैभव सूर्यवंशीने खूप मेहनत घेतली. नियमित ट्रेनिंगससह त्याने आहारावर देखील नियंत्रण ठेवले. डाएट प्लॅननुसार वैभवला बऱ्याच गोष्टींपासून लांब राहावे लागले. वैभवचे प्रशिक्षक मनीष ओझा यांनी त्याच्या प्रवासाबद्दल माहिती दिली. त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, वैभवला मटण आणि पिझ्झा खायला खूप आवडत होते. पण क्रिकेटसाठी वैभवने हे पदार्थ खाणे टाळले. यावरुन अवघ्या १४ वर्षांचा वैभव सूर्यवंशी खेळाविषयी किती समर्पित आहे यांचा अंदाज येतो.

Vaibhav Suryavanshi RR
Virat Kohli : इंग्लिसची चूक, नेहाल वढेरा बनला विराटचा शिकार; रनआउटनंतर किंग कोहलीचं खास सेलिब्रेशन, Video Viral

वैभव सूर्यवंशीच्या खेळीचे अनेकजण चाहते केले आहे. कालच्या सामन्यात कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेले समालोचक वैभवचे कौतुक करत होते. सोशल मीडियावर वैभव चर्चेचा विषय बनला आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई देखील वैभव सूर्यवंशीचे चाहते बनले आहेत. त्यांनी एक्सवर एक खास पोस्ट करत वैभवला शुभेच्छा दिल्या.

Vaibhav Suryavanshi RR
PBKS VS RCB : कृणाल पंड्याने श्रेयस अय्यरची अफलातून कॅच पकडली अन् शेपर्डनं विराटला कडेवरचं उचलून घेतलं, Video Viral

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com