
PBKS VS RCB : पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना सुरु झाला आहे. या सामन्यात टॉस जिंकत बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य हे पंजाबचे सलामीचे खेळाडू फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये उतरले.
प्रियांश आर्य २२ धावांवर बाद झाला. त्यानंतर प्रभसिमरन सिंगच्या साथीने श्रेयस अय्यरने खेळ पुढे नेला. ३३ धावा करुन प्रभसिमरन सिंग माघारी परतला. कृणाल पंड्याने दोन्ही सलामीवीरांना बाद केले. रोमारियो शेपर्डच्या ओव्हरमध्ये श्रेयस अय्यर कॅचआउट झाला. कृणाल पंड्याने धावत जाऊन अय्यरची कॅच पकडली. श्रेयस अय्यरची कॅच कृणालने पकडल्यानंतर रोमारियो शेपर्ड आणि विराट कोहली यांनी खास सेलिब्रेशन केले. विराटने उडी मारली आणि शेपर्डने विराटला उचलून घेतले.
१८ मार्च रोजी चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स हा सामना खेळला गेला. पावसामुळे सामना काही तासांसाठी पुढे ढकल्यात आला होता. १४ ओव्हर्सच्या खेळात पंजाबने बंगळुरूचा पराभव केला. या पराभवाचा वचपा काढण्याचा आज बंगळुरूचा संघ मैदानात उतरला आहे असे म्हटले जात आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची प्लेईंग ११ :
फिप सॉल्ट, विराट कोहली, रजत पाटीदार (कर्णधार), रोमारियो शेपर्ड, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, सुयश शर्मा, यश दयाल.
पंजाब किंग्सची प्लेईंग ११ -
प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), जॉश इंग्लिश, नेहाल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉयनिस, मार्को यान्सन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जेवियर बार्टलेट.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.