PBKS VS RCB : रजत पाटीदारचा 'सेफ' गेम! दुपारच्या सामन्यात पंजाबची कोंडी करण्याची करण्यासाठी खेळला डाव

PBKS VS RCB IPL 2025 : आयपीएल २०२५ मधील ३७ वा सामना आज पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाणार आहे. यात बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याची निर्णय घेतला आहे.
PBKS VS RCB Rajat Patidar
PBKS VS RCB Rajat PatidarX
Published On

IPL 2025 : पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या सामन्याला सुरुवात झाली आहे. रविवारच्या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याची निर्णय घेतला. आता पंजाब किंग्सचे खेळाडू फलंदाजीसाठी मैदानात उतरतील.

दोन दिवसांपूर्वी १८ एप्रिल रोजी चिन्नास्वामी स्टेडियमवर बंगळुरू विरुद्ध पंजाब हा सामना खेळला गेला होता. पावसामुळे सामन्यात २० ओव्हर्सऐवजी १४ ओव्हर्सचा खेळ झाला. त्या वेळेस पंजाबने बंगळुरूच्या घरच्या स्टेडियमवर त्यांचा पराभव केला. या पराभवाचा वचपा आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू घेण्याच्या तयारीत आहेत.

PBKS VS RCB Rajat Patidar
Anaya Bangar: ते न्यूड फोटो मला पाठवायचे, संबंध ठेवायला सांगायचे, भारतीय क्रिकेटपटूंवर अनाया बांगरचे धक्कादायक आरोप

टॉस जिंकल्यानंतर काल दुपारच्या सामन्यात गुजरातने प्रथम गोलंदाजी केली होती. आजच्या सामन्यातही बंगळुरूने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदार म्हणाला, 'प्रथम गोलंदाजी करताना उन्हाचा त्रास होईल पण, दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी केल्याने जास्त क्लॉरिटी येईल. घरच्या स्टेडियमवर पराभव होतो पण याचा अर्थ आम्ही जागा पाहून खेळतो असा होत नाही.' खराब फॉर्ममुळे लियाम लिव्हिंगस्टोनच्या जागी रोमारियो शेपर्डला संधी दिल्याचे पाटीदारने सांगितले.

PBKS VS RCB Rajat Patidar
Sundar Pichai : १४ वर्षाच्या वैभव सूर्यवंशीचे सुंदर पिचाई फॅन, एक्स पोस्ट करुन दिल्या शुभेच्छा, "आठवीतल्या पोराला IPL..."

'मी टॉस जिंकलो असतो तर आम्हीदेखील प्रथम गोलंदाजी केली असती. हरकत नाही आम्ही परिस्थितीला अनुसरुन खेळू. हा पंजाबचा आयपीएल २०२५ मधला पहिला दुपारचा सामना आहे,' असे पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला. आता पंजाबचे खेळाडू फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहेत.

PBKS VS RCB Rajat Patidar
Shubman Gill : सामना जिंकला, गुजरातने पॉईंट्स टेबलवर टॉप केले; पण एका चुकीमुळे शुबमन गिलवर झाली कारवाई

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची प्लेईंग ११ :

फिप सॉल्ट, विराट कोहली, रजत पाटीदार (कर्णधार), रोमारियो शेपर्ड, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, सुयश शर्मा, यश दयाल

पंजाब किंग्सची प्लेईंग ११ -

प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), जॉश इंग्लिश, नेहाल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉयनिस, मार्को यान्सन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जेवियर बार्टलेट

PBKS VS RCB Rajat Patidar
Anaya Bangar : माझ्या मम्मीची सून बनशील का? लिंग परिवर्तन केलेल्या संजय बांगरच्या लेकाला लग्नाची ऑफर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com