Virat Kohli : इंग्लिसची चूक, नेहाल वढेरा बनला विराटचा शिकार; रनआउटनंतर किंग कोहलीचं खास सेलिब्रेशन, Video Viral

PBKS VS RCB IPL 2025 : पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना सुरु आहे. या सामन्यात विराट कोहलीच्या रनआउट सेलिब्रेशनची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे.
Virat Kohli PBKS VS RCB
Virat Kohli PBKS VS RCBX
Published On

IPL 2025 मधील ३७ वा सामना आज पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना रंगला आहे. या सामन्यात रजत पाटीदारने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचे निवडले. त्यानंतर पंजाब किंग्सचे फलंदाज मैदानात उतरले. सुरुवातीला चांगला खेळ केल्याने पंजाबची टॉप ऑर्डर कोसळली. दोन्ही सलामीवीर आणि कर्णधार बाद होऊन माघारी परतले.

कृणाल पंड्याने प्रियांश आर्यच्या रुपाने पंजाबला पहिला धक्का दिला. आर्य २२ धावांवर बाद झाला. प्रभसिमरन सिंगने ३३ धावा केल्या. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि जॉश इंग्लिस फलंदाजी करत होते. रोमारियो शेपर्डच्या ओव्हरमध्ये कृणाल पंड्याने अप्रतिम कॅच पकडून श्रेयस अय्यरला माघारी पाठवले. विराट कोहलीने नेहाल वढेराला रनआउट केले. त्यावेळेस विराट कोहलीने वेगळ्या प्रकारे सेलिब्रेशन केले.

Virat Kohli PBKS VS RCB
PBKS VS RCB : कृणाल पंड्याने श्रेयस अय्यरची अफलातून कॅच पकडली अन् शेपर्डनं विराटला कडेवरचं उचलून घेतलं, Video Viral

नेमकं काय घडलं?

नवव्या ओव्हरमध्ये सुयश शर्मा गोलंदाजी करायला आला. त्याच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर जॉश इंग्लिस स्ट्राईकवर होता. त्याने शॉट मारला आणि एक धाव घेतली. त्यानंतर दुसरी धाव घेण्यासाठी नेहाल वधेरा पुढे धावला. पण इंग्लिस गोंधळला. या नादात इन-फॉर्म नेहाल वधेराची विकेट पडली. नेहालला बाद केल्यानंतर विराट कोहली दोन्ही हातांनी खास सेलिब्रेशन केले. त्याच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Virat Kohli PBKS VS RCB
Sundar Pichai : १४ वर्षाच्या वैभव सूर्यवंशीचे सुंदर पिचाई फॅन, एक्स पोस्ट करुन दिल्या शुभेच्छा, "आठवीतल्या पोराला IPL..."

नेहाल वधेराच्या विकेटनंतर सुयश शर्मा १४ व्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आला. या ओव्हरमध्ये त्याने दोन विकेट्स घेतल्या. सुयश शर्माने मार्को यान्सन आणि जॉश इंग्लिस यांना बाद केले. १, विकेट, १, १, विकेट, ० अशी गोलंदाजी सुयश शर्माने केली. त्याने पंजाब किंग्सची फलंदाजांची मध्यम फळी मोडली.

Virat Kohli PBKS VS RCB
Ayush Mhatre : मुंबईविरुद्ध IPLमध्ये पदार्पण, आयुष म्हात्रेचा मराठी VIDEO; घरच्या मैदानात वसईचा पठ्ठ्या राडा करणार

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची प्लेईंग ११ :

फिप सॉल्ट, विराट कोहली, रजत पाटीदार (कर्णधार), रोमारियो शेपर्ड, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, सुयश शर्मा, यश दयाल

पंजाब किंग्सची प्लेईंग ११ -

प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), जॉश इंग्लिस, नेहाल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉयनिस, मार्को यान्सन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जेवियर बार्टलेट

Virat Kohli PBKS VS RCB
Shubman Gill : सामना जिंकला, गुजरातने पॉईंट्स टेबलवर टॉप केले; पण एका चुकीमुळे शुबमन गिलवर झाली कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com