महिलांशी अनैतिक संबंध, हुंड्यासाठी छळ, घरगुती हिंसा... IPL मध्ये १७४ विकेट्स घेतलेल्या खेळाडूवर पत्नीचे गंभीर आरोप

IPL News : भारताचा फिरकीपटू अमित मिश्रा त्याच्या पत्नीने केलेल्या आरोपांमुळे अडचणीत सापडला आहे. विवाहबाह्य संबंध, घरगुती हिंसा अशा प्रकारचे गंभीर आरोप मिश्रावर करण्यात आले आहेत.
IPL News
IPL News X
Published On

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यात बऱ्याच वर्षांपासून वाद सुरु आहे. २०१८ मध्ये हसीन जहाँने शमीवर घरगुती हिंसाचार, हुंड्यासाठी छळ, मॅच फिक्सिंग असे गंभीर आरोप केले. यामुळे मोहम्मद शमीच्या अडचणींमध्ये वाढ झाली होती. अशाच प्रकारे आणखी एका भारतीय क्रिकेटपटूच्या अडचणी वाढल्या आहेत. या खेळाडूचे नाव आहे अमित मिश्रा.

अमित मिश्राची पत्नी गरिमा मिश्राने पोलीस आयुक्तांना भेट घेतली. पती (अमित मिश्रा) आणि सासरच्या लोकांनी पैशांसाठी छळ केल्याचा आरोप गरिमाने पोलीस आयुक्तांकडे केली. 'होंडा सिटी कार आणि १० लाख रुपयांसाठी मला पती आणि त्याचे कुटुंब त्रास देत आहे. माझ्या पतीचे अनेक महिलांशी अवैध संबंध आहेत', असे गरिमा मिश्राने म्हटले आहे. गरिमाच्या आरोपांमुळे अमित मिश्राच्या अडचणी वाढल्याचे म्हटले जात आहे.

IPL News
PBKS VS RCB : कृणाल पंड्याने श्रेयस अय्यरची अफलातून कॅच पकडली अन् शेपर्डनं विराटला कडेवरचं उचलून घेतलं, Video Viral

२६ एप्रिल २०२१ मध्ये अमित आणि गरिमा यांचा विवाह झाला होता. अमित मिश्रा सध्या क्रिकेट विश्वामध्ये फारसा सक्रीय नाहीये. तो कानपूरच्या भारतीय रिझर्व्ह बँकेत कामाला आहे. 'अमित मिश्राने अनेकदा मारहाण केली. इतर महिलांसोबतच्या अनैतिक संबंधांवर आक्षेप घेतल्याने चार महिन्यांपूर्वी डिसेंबर २०२४ मध्ये मला घरातून बाहेर हाकलून दिले' असे गरिमा मिश्राने आरोप केला आहे. 'दुसऱ्या बाजूला माझी पत्नी मला त्रास देते. तिने मला एकदा बँकेच्या ऑफिसबाहेर मारहाण केली होती' असे अमित मिश्रा यांनी म्हटले आहे.

IPL News
MI विरुद्धच्या सामन्यात CSK ने मुंबईचा खेळाडू मैदानात उतरवला, जाणून घ्या कोण आहे आयुष म्हात्रे?

अमित मिश्राने २००३ मध्ये भारताकडून खेळताना वनडे आणि कसोटी फॉरमॅटमध्ये पदार्पण केले होते. २०१० मध्ये त्याला टी-२० फॉरमॅटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. अमित मिश्राने टीम इंडियाकडून खेळताना २२ कसोटी सामन्यात ६५ विकेट्स, ३६ वनडे सामन्यात ६४ विकेट्स आणि १० टी-२० सामन्यात १६ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये अमित मिश्राने १६२ सामन्यांमध्ये १७४ विकेट्स घेतल्या आहेत.

IPL News
Vaibhav Suryavanshi : पदार्पणात खळबळ माजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीला मटण आणि पिझ्झा खाण्यास बंदी, कारण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com